मोरा जेट्टीजवळ बोट 
बुडून खलाशाचा मृत्यू

मोरा जेट्टीजवळ बोट बुडून खलाशाचा मृत्यू

Published on

मोरा जेट्टीजवळ बोट
बुडून खलाशाचा मृत्यू
उरण, ता. २७ (वार्ताहर) : खांदेरी किल्ल्याजवळील बोट दुर्घटनेनंतर मोरा समुद्रकिनारी जेट्टीजवळ आणखी एक बोट बुडाल्याची घटना घडली आहे. यात परप्रांतीय खलाशाचा मृत्यू झाला आहे. सुरेश विश्वनाथ गौतम असे या खलाशाचे नाव आहे.
वादळी हवामानामुळे प्रवासी वाहतूक बंद केली आहे. तसेच मासेमारीबंदी आहे. ही बंदी झुगारून बोटीद्वारे मासेमारी सुरू आहे. मत्स्यव्यवसाय विभागाच्या अधिकारी याकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे अशा दुर्घटना होत आहेत.

Marathi News Esakal
www.esakal.com