आकार जिम्नॅस्टिक्सच्या ३ खेळाडूंची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

आकार जिम्नॅस्टिक्सच्या ३ खेळाडूंची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

Published on

आकार जिम्नॅस्टिक्सच्या तीन खेळाडूंची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड
कल्याण, ता. २७ (वार्ताहर) : कल्याणजवळील बापगाव येथील आकार जिम्नॅस्टिक्स सेंटरमधील तीन खेळाडू ट्रॅम्पोलीन जिम्नॅस्टिक्सच्या चॅम्पियनशिप राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवडले आहेत. यात चिराग केणे (सब ज्युनियर), अभिप्रीत विचारे (ज्युनियर) आणि वार्या पाटील टंबलिन (ज्युनियर) यांची निवड झाली आहे. हे खेळाडू ८ ते १० ऑगस्ट यादरम्यान डेहराडूनमध्ये होणाऱ्या स्पर्धेसाठी कसून सराव करत आहेत.
कल्याणातील आकार जिम्नॅस्टिक्स सेंटरमध्ये आजवर शेकडो खेळाडूंनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी करत शहराचा नावलौकिक केला आहे. आता या तीन खेळाडूंनी राज्य स्तरावर आपल्या खेळाची चमक दाखवत राज्य संघात स्थान मिळविण्यात यशस्वी ठरले आहेत. या खेळाडूंना मुख्य प्रशिक्षक निशांत यशवंतराव यांचं तंत्रशुद्ध मार्गदर्शन आणि आंतरराष्ट्रीय पदक विजेता व शिवछत्रपती पदक विजेता प्रशिक्षक अभिजित ईश्वर शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
जिम्नॅस्टिक्सची आवड असलेल्या आपल्या दोन्ही मुलांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण घेता यावे या उद्देशाने पुष्पा शिंदे यांनी आकार जिम्नॅस्टिक्सची कल्याणजवळील बापगाव परिसरात निर्मिती केली असून, सध्या या केंद्रात आंतरराष्ट्रीय दर्जाची उपकरणं, ट्रॅम्पोलीन, टम्बलिंग ट्रॅक, फ्लोअरिंग, सेफ्टी मॅट्स आणि अनुभवी कोचिंग स्टाफ उपलब्ध आहे. ऑलिंपिक स्पर्धेत निवड झालेले देशभरातील खेळाडू या केंद्रात सरावासाठी येतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com