शिरवणे शाळेत नागपंचमीनिमित्त पारंपरिक खेळ

शिरवणे शाळेत नागपंचमीनिमित्त पारंपरिक खेळ

Published on

शिरवणे शाळेत नागपंचमीनिमित्त पारंपरिक खेळ
तुर्भे, ता. ३० (बातमीदार) ः ग्रामसंस्कृती, लोककला, सण-उत्सव आणि जीवनमूल्ये विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्यासाठी नवी मुंबई महापालिकेच्या शाळा क्रमांक १५, शिरवणे येथे नागपंचमी मंगळवारी (ता. २९) अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली. मुख्याध्यापिका रंजना साळी यांच्या मार्गदर्शनाखाली विविध सांस्कृतिक व शैक्षणिक उपक्रम यावेळी राबविण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांनी मातीपासून बनवलेल्या पर्यावरणपूरक नागदेवतेच्या मूर्तींना पूजा करून केली. हा उपक्रम पर्यावरण स्नेही सण साजरा करण्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण ठरला. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हस्तकौशल्यातून मूर्ती बनवून परंपरेशी जोडलेली नाळ अधोरेखित केली. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी श्रावण-भाद्रपद महिन्यातील विविध सण, व्रतवैकल्ये यांची माहिती भाषणांद्वारे सादर केली. या माध्यमातून सणांचे धार्मिक, सामाजिक आणि नैतिक पैलू विद्यार्थ्यांना उलगडून दाखवण्यात आले. यावेळी झिम्मा, फुगडी, कोंबडा, गोफ हे पारंपरिक खेळ मुलींच्या सहभागातून सादर झाले, तर मुलांनी पारंपरिक वेशभूषेत नृत्ये सादर करून उत्सवाला रंगत आणली. कार्यक्रमात घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांमध्ये उत्तम कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या बक्षिसांनी गौरविण्यात आले. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रोत्साहनाचे वातावरण निर्माण झाले.
...............
पर्यावरण आणि संस्कृतीचस मिलाफ
या कार्यक्रमादरम्यान प्रणाली पिंपळे यांनी पर्यावरण रक्षण व अन्न साखळीतील पशु-पक्ष्यांचे महत्त्व यावर मार्गदर्शन केले. नागपंचमीचा सण केवळ धार्मिक नव्हे, तर प्राणीमात्रांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिन असल्याचे त्यांनी सांगितले. मुख्याध्यापिका रंजना साळी यांनी आपल्या भाषणात सांगितले की, सणवार व व्रतवैकल्ये ही आपल्या संस्कृतीचे संवर्धक आहेत आणि त्यांचे जतन करणे आज काळाची गरज आहे. या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये लोकपरंपरेविषयी आदर आणि पर्यावरणाबद्दल जागरूकता निर्माण झाली. पालकवर्ग व शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या उपक्रमशीलतेचे कौतुक केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com