शिवळे येथे विज्ञान, पोषण मेळावा

शिवळे येथे विज्ञान, पोषण मेळावा

Published on

मुरबाड, ता. २९ (वार्ताहर) : विद्यामंदिर हायस्कूल, शिवळे येथे अगस्त्य इंटरनॅशनल फाउंडेशन आणि सोसायटी जनरल सिक्युरिटी सर्व्हिस यांच्या संयुक्त विद्यमाने विज्ञान व पोषण मेळाव्याचे आयोजन नुकतेच करण्यात आले. ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा आणि पोषणाविषयी जागरूकता वाढावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
या कार्यक्रमाचे उद्‍घाटन महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष व विद्यासेवक पतसंस्था, ठाणे-पालघरचे उपाध्यक्ष धनाजी दळवी यांच्या हस्ते झाले. शाळेचे मुख्याध्यापक धलपे, शिक्षकवृंद व अगस्त्य संस्थेचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. या विज्ञान व पोषण मेळाव्यात एकूण ३८ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी कमी खर्चातील विज्ञान मॉडेल्स, पेपरट्रॉनिक अ‍ॅक्टिव्हिटीज सादर केल्या. काही विद्यार्थ्यांनी विविध पौष्टिक पदार्थ बनवून त्यामागील पोषणमूल्यांची माहिती दिली. कार्यक्रमादरम्यान शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे सादरीकरण कौतुकास्पद ठरल्याचे मत व्यक्त केले.
प्रमुख पाहुणे धनाजी दळवी यांनी, अगस्त्य फाउंडेशनद्वारे अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड आणि प्रयोगशीलता वाढते, असे मत व्यक्त करत संस्थेचे अभिनंदन केले. संस्थेच्या रिंकू पडवळ व तेजस्विता माळी या विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान विषयाची गोडी निर्माण करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करत आहेत. हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उपयुक्त ठरल्याचे समाधान पालक, शिक्षक आणि आयोजकांनी व्यक्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com