सातही तलाव ८९ टक्के भरले
सातही तलाव ८९ टक्के भरले
मुंबईकरांची पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, २९ ः मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून संततधार पाऊस पडत असल्याने मुंबईला पाणी पुरविणाऱ्या सर्व तलावांमध्ये १२,८३,७४१ दक्षलक्ष लिटर म्हणजे ८९ टक्के जलसाठा उपलब्ध झाला आहे. उपलब्ध जलसाठा हा पुढील ३१८ दिवस म्हणजेच पुढील १० जून २०२६ पर्यंत पुरेल इतका आहे. त्यामुळे मुंबईकरांची पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे.
मुंबईला सात तलावांतून दररोज ३,८५० दशलक्ष लिटर इतका, तर ठाणे, भिवंडी महापालिका क्षेत्राला दररोज १८० दशलक्ष लिटर इतका म्हणजेच एकूण ४,०३० दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा केला जातो. तसेच जुलै महिन्याचे चार दिवस, संपूर्ण ऑगस्ट आणि सप्टेंबर महिना म्हणजेच पावसाचे आणखी दोन महिने बाकी आहेत. यंदा लवकर म्हणजे २६ मेपासून पावसाळा सुरू झाला आहे, मात्र जून महिन्यात तलाव क्षेत्रात अपेक्षित पाऊस पडला नाही. जुलै महिन्यात मात्र चांगला पाऊस पडत आहे. त्यामुळे सातपैकी एक मोडक सागर तलाव ९ जुलैपासून ओव्हरफ्लो झाला, तर तानसा तलाव हा २३ जुलैपासून ओव्हरफ्लो झाला. सद्यःस्थितीत तलावांत ८९ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. सध्या तलावांत पाऊस समाधानकारक पडत असून, अजून पावसाचे दोन महिने शिल्लक आहेत. त्यामुळे तलाव भरून वाहतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
...
मध्य वैतरणा लवकरच होणार ओव्हरफ्लो
मध्य वैतरणा तलावात सध्या ९४.८५ टक्के पाणीसाठा जमा झाला असून, जोरदार पाऊस पडल्यास हा तलाव कोणत्याही क्षणी भरून वाहू लागेल. तसेच अप्पर वैतरणा हा तलाव जवळजवळ ८१.४५ टक्के तर भातसा तलावदेखील ८६.११ टक्के भरला आहे, मात्र तुळशी तलावात ७८.११ टक्के आणि विहार तलावात ७०.२१ टक्के इतका पाणीसाठा जमा झाला आहे.
...
२८ जुलै सकाळपर्यंतचा पाणीसाठा (द. ल. लिटर)
तलाव पाणीसाठा टक्के
अप्पर वैतरणा १,८४,९२६ ८१.४५
मोडक सागर १,२८,९२५ १००.००
तानसा १,४३,१८१ ९८.६९
मध्य वैतरणा १,८३,५६३ ९४.८५
भातसा ६,१७,४१३ ८६.११
विहार १९,४४८ ७०.२१
तुळशी ६,२८५ ७८.११
...
२०२५ १२,८३,७४१ ८८.७०
२०२४ १०,५६,१५७ ७२.९७
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.