उत्कृष्ट ग्रंथालय आणि उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व सेवक पुरस्कार जाहीर
उत्कृष्ट ग्रंथालय आणि उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व सेवक पुरस्कार जाहीर
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची घोषणा
मुंबई, ता. २९ : राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालयांना देण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय पुरस्कार आणि ग्रंथालय चळवळीतील कार्यकर्ते व सेवक यांना दिले जाणारे डॉ. एस. आर. रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व सेवक (ग्रंथमित्र) पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. पाटकर सभागृह, एसएनडीटी महिला विद्यापीठ, मुंबई येथे १२ ऑगस्ट रोजी पुरस्कार प्रदान करण्यात येईल, अशी घोषणा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली.
२०२३-२४ या वर्षासाठीचे हे पुरस्कार असून, यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय पुरस्कार शहरी विभागात चार आणि ग्रामीण विभागात तीन उत्कृष्ट ग्रंथालयांना त्यांच्या वर्गवारीनुसार जाहीर करण्यात आले आहेत. शहरी भागासाठी रोख रक्कम अनुक्रमे एक लाख ते २५ हजार रुपये, ग्रामीण भागासाठी ७५ हजार ते २५ हजार आणि सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र असे स्वरूप आहे.
डॉ. एस. आर. रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता (ग्रंथमित्र) पुरस्कार राज्य स्तरावर दोघांना जाहीर झाले असून, पुरस्कार रक्कम ५० हजार आहे. विभाग स्तरावर पाच जणांना जाहीर झाले आहेत. तर डॉ. एस. आर. रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय सेवक (ग्रंथमित्र) पुरस्कार हे विभाग स्तरावर सहा जणांना जाहीर झाले आहेत. या सर्व पुरस्कारांचे रोख २५ हजार रुपये, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र असे स्वरूप आहे. या पुरस्कार सोहळ्याचे वितरण लवकरच करण्यात येणार आहे.
--
उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय पुरस्कार
शहरी विभाग :
- सार्वजनिक वाचनालय, शिवाजी चौक, कल्याण पश्चिम, ता. कल्याण, जि. ठाणे
- सर्वात्मक वाचनालय, बापू बंगला स्टॉप, इंदिरानगर, नाशिक
- ज्ञानदीप सार्वजनिक वाचनालय, ता. वाघापूर, जि. यवतमाळ
- मा. शिल्पकार ल. ना. भालेराव सार्वजनिक वाचनालय, पंचवटी, नाशिक
--
ग्रामीण विभाग
१) स्व. समीर (तात्या) सोनटक्के वाचनालय, चोराखळी, ता. कळंब, जि. धाराशिव
२) बलराम सार्वजनिक वाचनालय, फुलउमरी, ता. मानोरा, जि. वाशिम
३) प्रगती सार्वजनिक वाचनालय, सिल्ली (आंबाडी) जि. भंडारा
--
डॉ. रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता पुरस्कार
राज्यस्तरीय ग्रंथालय कार्यकर्ता (ग्रंथमित्र)
- धनंजय पवार, हासाळा, पो. बुधोडा, ता. औसा, जि. लातूर
राज्यस्तरीय ग्रंथालय सेवक (ग्रंथमित्र)
- श्रद्धा आमडेकर, देवरुख, ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी
--
विभागस्तरीय पुरस्कार
- अमरावती : रामभाऊ मुळे, मु. पो. हनुमाननगर, अकोला, ता. जि. अकोला
- छत्रपती संभाजीनगर : खंडेराव सरनाईक, केंद्रा बु., ता. सेनगाव, जि. हिंगोली
- नाशिक : राहुलकुमार महिरे, मु.पो. आखाडे, ता. साक्री, जि. धुळे
- पुणे : दत्तात्रय देशपांडे, जरळी, ता. गडहिंग्लज, जि. कोल्हापूर
- मुंबई : सुभाष कुळकर्णी, वाशी, नवी मुंबई
--
डॉ. रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय सेवक पुरस्कार
- अमरावती : अनंत सातव, पातुर्डा बु., ता. संग्रामपूर, जि. बुलडाणा
- छत्रपती संभाजीनगर : सूर्यकांत जाधव, आलमला, ता. औसा, जि. लातूर
- नागपूर : खेमचंद डोंगरवार, नवेगाव, बांध, ता. अर्जुनी मोरगाव, जि. गोंदिया
- नाशिक : चिंतामण उगलमुगले, ओंकारनगर, पेठ रोड, ता. जि. नाशिक
- पुणे : रुपाली मुळे, ग्रंथपाल, श्री. छ. प्रतापसिंह महाराज (थोरले) नगर वाचनालय, सातारा
- मुंबई : संजय शिंदे, मालवण, जि. सिंधुदुर्ग
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.