विद्यार्थ्यांमध्ये सापांविषयी जनजागृती
विद्यार्थ्यांमध्ये सापांविषयी जनजागृती
आयडियल इंग्लिश स्कूलमध्ये नागपंचमी साजरी
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ३० ः नागपंचमी या सणाला नागाची पूजा केली जाते. साप हा शेतकरी मित्र असल्याने या दिवशी नागदेवतेच्या विविध विधी आणि पूजा केल्या जातात. असे मानले जाते, की नाग शेतकऱ्यांना संरक्षण आणि समृद्धी प्रदान करतात. यानिमित्त आयडियल इंग्लिश स्कूलने डॉ. नीलेश भणगे आणि ऋषिकेश सुरसे यांना सर्प आणि त्यांच्या महत्त्वाविषयी शालेय विद्यार्थ्यांना माहिती देण्यासाठी आमंत्रित केले होते. आयडियल शाखेच्या मुख्याध्यापिका पांडे यांनी सलग चौथ्या वर्षी हा कार्यक्रम आयोजित केला होता. दोन्ही शाळांतील सुमारे २३० विद्यार्थ्यांना या कार्यक्रमातून लाभ झाला.
ऋषिकेश सुरसे यांनी विषारी आणि बिनविषारी सर्प यावर मार्गदर्शन केले. आपल्या देशात सर्पाच्या सुमारे ३०० हून अधिक जाती आहेत. त्यापैकी नाग, मण्यार, घोणस, फुरसे या चारच जाती विषारी आहेत. हे साप चावल्यानंतर वेळीच उपचार न मिळाल्याने माणसाचा मृत्यू होतो. आपल्या देशात दरवर्षी सर्पदंशामुळे किमान ४५ हजार जणांचा मृत्यू होतो. विषारी साप चावल्यानंतर त्याच्यावर प्रतिसर्प विष औषध म्हणून वापरले जाते; पण आपल्याकडील अनेक गावांतील सरकारी दवाखान्यांत हे औषध उपलब्ध नसते. या औषधाचा प्रसार अधिक झाल्यास आपण सर्पदंशामुळे होणारे मृत्यू रोखू शकतो. साप हा कधीच आपणहून माणसाला चावत नाही. तो स्वसंरक्षण म्हणून माणसावर हल्ला करतो.
निसर्गाचे संतुलन बिघडते
अनेकदा लोक साप दिसल्यावर त्याला मारण्यासाठी धाव घेतात. त्यांनी तसे न करता त्याच्या संरक्षणाचे अधिक प्रयत्न केले तर ही नैसर्गिक संपदा मानवाच्या भल्यासाठीच कामी येईल, यासाठी सर्पमित्र अहोरात्र साप मानवी वस्तीतून पकडून निसर्गाच्या सान्निध्यात सोडतात. या कार्यक्रमात, सापाला मारल्याने निसर्गाचे संतुलन बिघडते, शिवाय जर आपल्या सभोवताली असणाऱ्या सर्व सापांना मारले तर आपल्या भागात उंदीर, घुशींचे साम्राज्य पसरून अब्जावधी टन अन्नधान्याची नासाडी होईल, हे विद्यार्थ्यांना समजावून दिले. डॉ. नीलेश भणगे यांनी सर्पदंश कसा टाळता येईल, साप चावल्यावर प्राथमिक दक्षता कोणती घ्यावी, याबद्दल माहिती दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.