गुप्तधनाच्या नादात ३९ लाख गमावले

गुप्तधनाच्या नादात ३९ लाख गमावले

Published on

गुप्तधनाच्या नादात ३९ लाख गमावले
मांत्रिकासह दोघे फरार, पनवेल शहर पोलिसांकडून शोध सुरू
पनवेल, ता. ३० (वार्ताहर) : घरावरील करणी दूर करून शेतातील गुप्तधन देण्याच्या बहाण्याने एका मांत्रिकाने तांत्रिक विधीचा बहाणा करून पनवेलमधील एका व्यक्तीकडून तब्बल ३९ लाख ७० हजारांचा ऐवज लुबाडला आहे. या प्रकरणातील मांत्रिकासह फरारी दोन साथीदारांविरोधात पनवेल शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
पनवेलमधील वाजे येथे राहणारे प्रवीण पाटील (४१) नामांकित कंपनीमध्ये उच्चपदावर कार्यरत आहेत. सततचे अपयश, मानसिक तणावाबद्दल मार्च २०२५ मध्ये त्यांनी मित्र जयेश भोपी याच्याशी चर्चा केली होती. त्यानंतर जयेशने ज्योतिष बसवराज मगदूम यांच्याकडे नेले होते. बसवराजने तौसीफ मुजावर नावाच्या मांत्रिकासोबत ओळख करून दिली होती. प्रवीण यांच्या शेतात गुप्तधन असून, घरावर कोणीतरी करणी केल्याचे सांगितले. तसेच विविध पूजा-विधी करण्यास सुचवले. प्रवीण पाटील यांच्या बहिणीच्या वाजे येथील फार्महाउसवरदेखील विविध पूजाविधी करण्यात आल्या. त्यांच्याकडून सोन्याचे दागिने, गंठण, चेन, तावीजसह पाच लाखांची रोख रक्कम अशी एकूण ३९.७० लाख रुपयांची मालमत्ता मंत्रपूजेच्या नावाखाली घेतली. तसेच कपडा उघडल्यास दागिन्यांची माती होईल, अशी भीतीदेखील घातली होती.
----------------------------------
महिनाभरानंतर भांडाफोड
मांत्रिक तौसीफ मुजावर महिनाभरानंतर घरी आला नसल्याने प्रवीण पाटील यांना संशय आला. त्यांनी बहिणीच्या घरी ठेवलेले दागिने व रोख रक्कम असलेला कपडा उघडून पाहणी केली असता, त्यात माती असल्याचे आढळून आले. त्यानंतर फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्याने पनवेल शहर पोलिस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दाखल केली गेली.
-----------------------------------------
फसवणुकीचा गुन्हा दाखल
पोलिसांनी मांत्रिक तौसीफ मुजावर, त्याचे सहकारी मेहताब मुजावर, अझर मुजावरविरोधात फसवणूक, अपहार व विश्वासघात तसेच महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा, जादूटोणा यांना प्रतिबंध करण्याबाबत त्याचे समूळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम २०१३ नुसार गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com