गोकुळधाम दुहेरीकर भरेल का?

गोकुळधाम दुहेरीकर भरेल का?

Published on

गोकुळधाम दुहेरी कर भरेल का?
परिवर्तनचे ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’च्या आत्माराम भिडेंना अनावृत्त पत्र!
पनवेल ता. २८ (बातमीदार) ः पनवेल महानगरपालिकेने मालमत्ता करावरील शास्ती माफीची अभय योजना जाहीर केली आहे. त्यानुसार मालमत्ताधारकांनी कर भरावा यासाठी तारक मेहता का उल्टा चश्मा या मालिकेतील आत्माराम भिडेंचा रोल करणाऱ्या कलाकाराने जाहिरात केली. तुमच्या गोकुळधाम सोसायटीला दोन कर लावले तर ते भराल का, अशा प्रश्नाचे अनावृत्त पत्रच परिवर्तन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष महादेव वाघमारे यांनी लिहून नाराजी व्यक्त केली. हे पत्र मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहे.
पालिकेच्या मालमत्ता कराचा तिढा अद्यापही सुटलेला आहे. या विरोधात न्यायालयीन लढाई सुरू आहे. आम्ही दुहेरी तसेच पूर्वलक्षी कर भरणार नाही अशा प्रकारची भूमिका मालमत्ताधारकांनी घेतलेले आहे. त्यामुळे पालिकेचा कोट्यावधी रुपयांचा मालमत्ता कर थकीत आहे. त्यातच महानगरपालिकेची निवडणूक तोंडावर आल्याने भाजपच्या माजी नगरसेवकांनी महापालिकेत आंदोलन करून शास्ती माफ करावी, अशी मागणी केली. तत्पूर्वी नगर विकास मंत्री तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नगरसचिवांना दिलेल्या आदेशानंतर यासंदर्भात बैठक पार पडली. या विषयी निर्णय घेण्याचा पूर्णपणे अधिकार आयुक्तांना असल्याचे सचिवांनी स्पष्ट केले. आयुक्त मंगेश चितळे यांनी विशिष्ट मुदतीत संपूर्ण मालमत्ता कर भरल्यास ९० ते २५ टक्के सूट देण्याची अभय योजना घोषित केली. मात्र, मूळ मालमत्ता करामध्ये कोणतीही सवलत दिली नसल्याचे विविध सामाजिक संघटना आणि महाविकास आघाडीचे म्हणणे आहे. अभय योजनेच्याची प्रशासनाकडून जाहिरात सुद्धा केलेली आहे.

भिडेंना पत्र
आत्माराम भिडे हे गोकुळधाम सोसायटीचे सचिव आहेत. आणि त्यांची व्यक्तिरेखा ही अत्यंत पारदर्शी, वक्तशीर त्याचबरोबर वस्तुस्थितीच्या पलीकडे जाऊन कोणतेही काम करायचे नाही किंवा त्याला समर्थन करायचे नाही, ती प्रत्येक प्रेक्षकांच्या मनामध्ये रुजली आहे. आपला अभिनय अनेकांच्या मनावरती अधिराज्य करून गेला आहे. परंतु, पनवेल महानगरपालिकेच्या शास्ती माफी अभय योजनेची जाहिरात आपण केली हे पनवेलकरांना रुचले नसल्याचा पत्रात उल्लेख आहे.

एकच काम आणि दोन कर का?
आपल्या गृहनिर्माण संस्थेतील सभासदांना एकाच कामाचे दोन प्रकारे देखभाल शुल्क पाठवले तर ते मान्य करतील का? या सोसायटीला जर दुहेरी आणि पूर्वलक्षी कर येथील स्थानिक स्वराज्य संस्थेने लादला तर आपण तो भरणार का याचे उत्तर एक सुजाण नागरिक व मालमत्ता धारक म्हणून आपण आम्हाला द्यावे, असे महादेव वाघमारे यांनी पत्रात म्हटले आहे.

एखादी जाहिरात करताना संबंधित कलाकारांनी जनसामान्यांच्या हिताची आहे का? याचा विचार करणे आवश्यक आहे. आत्माराम भिडे ही संबंधित कलाकाराने मालिकेमध्ये अनेक वर्ष गोकुळधामचे सचिव पद सांभाळ आहे. म्हणून त्यांना समस्त पनवेलकरांच्या वतीने परिवर्तन सामाजिक संस्थेने अनावृत्त पत्र लिहून मालमत्ता कर शास्ती माफी अभय योजनेबाबत पनवेलकर खुश नाहीत, असा संदेश पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे.
- महादेव वाघमारे, अध्यक्ष, परिवर्तन सामाजिक संस्था.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com