थोडक्‍यात बातम्या नवी मुंबई

थोडक्‍यात बातम्या नवी मुंबई

Published on

महिलांना तीर्थयात्रेचे दर्शन
नेरूळ (बातमीदार) ः नेरूळ गावातील महिलांना श्रावणानिमित्त अध्यात्मिक समाधान व सामाजिक सन्मान मिळवून देण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते अक्षय पाटील यांनी विशेष तीर्थयात्रेचे आयोजन केले होते. १५ ते २७ जुलै दरम्यान त्यांनी अष्टविनायक दर्शन यात्रा अगदी नाममात्र दरात आयोजित केली होती. यामध्ये नेरमळ गावातील पाटील कुटुंबातील १७० महिला, पुरुष, वृद्ध व लहानग्यांनी सहभाग घेतला. यामध्ये लेकी-सुना, नातवंडे, भाऊ-बहीण सर्वांनी एकत्र येत धार्मिकतेचा आणि स्नेहबंधांचा अनुभव घेतला.
....................
जुईनगरमध्ये विविध उपक्रमांची रेलचेल
जुईनगर (बातमीदार) ः शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांची रेलचेल पाहायला मिळाली. माजी नगरसेवक विशाल ससाणे यांच्या पुढाकाराने २७ ते ३१ जुलै दरम्यान आरोग्य शिबिर, वृक्षारोपण, कॅरम स्पर्धा, तसेच ज्येष्ठ नागरिकांचा वाढदिवस सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमांना स्थानिक नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. आरोग्य शिबिरात दंतचिकित्सा, डोळ्यांची तपासणी तसेच इतर शारीरिक चाचण्या करण्यात आल्या. २०० हून अधिक नागरिकांनी सहभाग घेतला. परिसरात २७ झाडांचे वृक्षारोपण करून त्याच्या संगोपनाची जबाबदारी स्थानिकांना देण्यात आली. ८० हून अधिक स्पर्धकांनी कॅरम स्पर्धेत भाग घेतला. जुलै महिन्यात वाढदिवस असलेल्या ज्येष्ठ नागरिकांचा यथोचित सन्मान करण्यात आला.
................
सानपाड्यात मूषक नियंत्रण मोहिमेची मागणी
नेरूळ (बातमीदार) ः सानपाडा सेक्टर २, ३, ७ आणि ८ परिसरात उंदरांच्या वाढत्या संख्येमुळे रहिवासी त्रस्त झाले आहेत. या पार्श्वभूमीवर भाजप युवा मोर्चाचे माजी नवी मुंबई जिल्हा उपाध्यक्ष व माथाडी युनियन जिल्हाध्यक्ष पांडूरंग आमले यांनी महापालिका आयुक्तांकडे मूषक नियंत्रण मोहीम राबविण्याची लेखी मागणी केली आहे. उंदीर घरातील वस्तू, कपडे, वायरिंग इत्यादींना हानी पोहोचवत आहेत. सोसायट्यांच्या आवारात आणि गाड्यांमध्ये नुकसान करत असून त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. उंदरांपासून मुक्तता मिळवण्यासाठी महापालिकेने त्वरीत मोहीम राबवावी, अशी जोरदार मागणी आमले यांनी केली आहे.
................
सीड बॉल उपक्रमात विद्यार्थ्यांचा सहभाग
वाशी (बातमीदार) ः वाशीतील वारकरी भवन येथे ‘माझी वसुंधरा अभियान ६.०’ अंतर्गत नवी मुंबई महापालिकेने सीड बॉल बनवण्याचा उपक्रम आयोजित केला. यामध्ये विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. फळांच्या बियांपासून मातीचे गोळे तयार करून मोकळ्या जागांमध्ये टाकण्याचा पर्यावरणपूरक संदेश या उपक्रमातून दिला गेला. माता अमृतानंदमयी मठ आणि तेरणा कॉलेजच्या एनएसएस युनिटने यामध्ये सक्रिय सहभाग घेतला. या बिया पावसात रुजल्याने झाडांची वाढ होते, असा शाश्वत उपाय यातून मिळतो. आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेला हा उपक्रम भविष्यात अधिक मोठ्या प्रमाणात राबविण्याचा महापालिकेचा मानस आहे.
........................
उरणमध्ये नागपंचमी उत्सव साजरा
उरण (वार्ताहर) ः तालुक्यात नागपंचमीचा पारंपरिक सण मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात आला. महिलांनी घराघरात नागदेवतांची पूजा केली. पूर्वी माळरानात नागाची पूजा केली जात होती, मात्र आता मातीच्या किंवा पंचधातूच्या मूर्ती घरी आणून पूजा केली जाते. नागदेवतेला शेतकऱ्यांचा रक्षणकर्ता मानले जाते. उंदीर पिकांचे नुकसान करत असल्याने नाग ही देवता शेतकऱ्यांची संरक्षक म्हणून पूजली जाते. विद्यार्थ्यांनाही या सणाची माहिती मिळावी म्हणून विविध शाळांमध्ये नागपंचमी साजरी करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com