निसर्ग संवर्धन दिनानिमित्त स्वच्छता मोहीम
निसर्ग संवर्धन दिनानिमित्त स्वच्छता मोहीम
एनएसएस विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
वाशी, ता. ३० (बातमीदार) ः जागतिक निसर्ग संवर्धन दिनाचे औचित्य साधून नवी मुंबई महापालिकेच्या वतीने शहरातील विविध सार्वजनिक ठिकाणी सखोल स्वच्छता मोहिमा राबवण्यात आल्या. "सफाई अपनाओ, बिमारी भगाओ" या अभियानांतर्गत महापालिकेच्या आठही विभागांमध्ये एकाच दिवशी हे उपक्रम जल्लोषात पार पडले. यामागचा उद्देश पर्यावरण संवर्धनाचा संदेश पोहोचवणे आणि नागरिकांमध्ये स्वच्छतेविषयी जनजागृती निर्माण करणे, असा होता.
महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. अजय गडदे, स्मिता काळे, तसेच परिमंडळ १ चे उपआयुक्त सोमनाथ पोटरे व परिमंडळ २ चे उपआयुक्त संजय शिंदे यांच्या देखरेखीखाली हा उपक्रम यशस्वीपणे पार पडला. या मोहिमांमध्ये महाविद्यालयीन एनएसएस विद्यार्थ्यांनी विशेष सहभाग नोंदवला. बेलापूर विभागात दिवाळेगाव जेट्टी परिसर, खाडी किनारा आणि खारफुटी भागातील प्लॅस्टिक, कागद व इतर कचरा संकलित करण्यात आला. या ठिकाणी भारती विद्यापीठ, विद्या उत्कर्ष मंडळ कॉलेज आणि रामशेठ ठाकूर कॉलेजचे एनएसएस विद्यार्थी सक्रियपणे सहभागी झाले. नेरूळ विभागात सेक्टर सहच्या ग्रीन बेल्टमध्ये सफाई करण्यात आली, तर वाशी विभागात सागर विहार जेट्टी आणि मिनी सी-शोअर पॉण्ड परिसराची स्वच्छता करण्यात आली. येथे केबीपी कॉलेज, फादर अॅग्नेल टेक्निकल व लॉ कॉलेजचे एनएसएस युनिट सहभागी झाले होते.
...................
तुर्भे विभागात सानपाडा स्टेशन आणि जुईनगर ट्रीबेल्ट, कोपरखैरणे विभागात रेल्वे स्थानक, घणसोली व ऐरोली विभागातील खाडी किनारे, तसेच दिघा विभागातील पटणी मैदान परिसरातही ही मोहीम राबवली गेली. मोहिमेदरम्यान सिंगल यूज प्लॅस्टिक, बाटल्या, कपडे व इतर कचरा गोळा करून त्याचे वर्गीकरण करून महापालिकेच्या कचरा प्रकल्पाकडे पाठवण्यात आले. या स्वच्छता मोहिमेनंतर नागरिकांना स्वच्छतेची शपथ देण्यात आली तसेच कचरा वर्गीकरणाचे महत्त्व समजावण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.