खारघरमध्ये सेंद्रिय खत निर्मितीचा उपक्रम सुरू
खारघरमध्ये सेंद्रिय खतनिर्मितीचा उपक्रम सुरू
पनवेल महापालिकेचे पर्यावरणपूरक पाऊल
खारघर, ता. ३० (बातमीदार) ः पनवेल महापालिकेच्या वतीने खारघर सेक्टर-१२ येथील वासुदेव बळवंत फडके उद्यानात सेंद्रिय खतनिर्मिती प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून उद्यानातील पाला-पाचोळा, झाडांच्या तुटलेल्या किंवा मोडकळीस आलेल्या फांद्यांचे व्यवस्थापन करून त्यापासून उत्तम प्रतीचे सेंद्रिय खत तयार केले जात आहे. हे खत उद्यानातील झाडांच्या पोषणासाठी वापरले जात असून, त्यामुळे उद्यान अधिक हिरवेगार आणि टवटवीत दिसू लागले आहे.
उद्यानात दररोज मोठ्या प्रमाणात पाला-पाचोळा आणि झाडांच्या फांद्या गोळा होतात. पूर्वी हा जैविक कचरा विल्हेवाट लावण्यासाठी जाळला जात होता, ज्यामुळे प्रदूषण वाढत असे. ही समस्या सोडवण्यासाठी पालिकेने ‘वुड श्रेडिंग मशीन’ची मदत घेतली आहे. या मशीनद्वारे झाडांच्या फांद्यांचे बारीक तुकडे केले जातात आणि ते जमिनीत कुजवून त्यातून सेंद्रिय खत तयार केले जाते.
या प्रकल्पाची देखरेख उद्यानाचे पर्यवेक्षक नितीन राठोड व त्यांच्या सहकाऱ्यांकडून केली जाते. उपयुक्त सेंद्रिय खतामुळे झाडांची वाढ सुधारते आणि खत खरेदीवरचा खर्च वाचतो. यामुळे पर्यावरणपूरक दृष्टिकोनातूनही महत्त्वाचा लाभ होत आहे. या उपक्रमामुळे जैविक कचऱ्याचे व्यवस्थापन, पर्यावरण संवर्धन आणि आर्थिक बचत या तिन्ही बाबी साध्य होत असून, नागरिकांकडून उपक्रमाचे विशेष कौतुक होत आहे.
.....................
खारघर, कळंबोली आणि कामोठे येथील उद्यानांमध्येही वुड श्रेडिंग मशीन बसवण्यात आले असून, तिथेही सेंद्रिय खतनिर्मिती सुरू आहे.
-वैभव विधाते, उपायुक्त, पनवेल महापालिका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.