मनोरंजन क्षेत्राला महापालिकेचे प्रोत्साहन

मनोरंजन क्षेत्राला महापालिकेचे प्रोत्साहन

Published on

मनोरंजन क्षेत्राला महापालिकेचे प्रोत्साहन
आयुक्त गगराणी : ‘मुंबई : द सिटी ऑफ फिल्म’चे प्रकाशन
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३० ः हिंदी चित्रपटांचे माहेरघर म्हणून मुंबईची जागतिक ओळख आहे. अर्थव्यवस्थेतील एक महत्त्वाचा घटक म्हणून मुंबईतील मनोरंजन क्षेत्राला उत्तमोत्तम सोयीसुविधा पुरविण्यासाठी मुंबई महापालिका कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी केले.
मुंबई महापालिकेचा व्यवसाय विकास विभाग आणि मुंबई युनेस्को क्रिएटिव्ह सिटी ऑफ फिल्म्स यांच्या वतीने बुधवारी (ता. ३०) मुंबईत विशेष परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी गगराणी बोलत होते.  या वेळी ‘मुंबई : द सिटी ऑफ फिल्म’ या कॉफीटेबल बुकचे तसेच ग्रीन फिल्मिंग हँडबुकचेही प्रकाशन करण्यात आले.  जगातील अनेक शहरांमध्ये मनोरंजन क्षेत्राचे प्रशासन स्थानिक प्रशासन संस्थेच्या अख्यत्यारित आहे. सेवासुविधांच्या अनुषंगाने पालिका मनोरंजन क्षेत्रासोबत कार्यरत आहे. हे क्षेत्र अधिक गौरवशाली व्हावे, यास अधिक वैभव प्राप्त व्हावे, यासाठी मुंबईला जागतिक सांस्कृतिक ठिकाण म्हणून पुढे आणण्यासाठी महापालिका प्रयत्नशील आहे. या माध्यमातून देशाला अभिमान वाटेल, अशी आणखी मोठी अर्थव्यवस्था आकारास यावी, असेही पालिका आयुक्त गगराणी म्हणाले.
दरम्यान, या वेळी अतिरिक्त आयुक्त डॉ. अमित सैनी, दादासाहेब फाळके चित्रनगरीचे सहव्यवस्थापकीय संचालक प्रशांत साजणीकर, व्हिसलिंग वूड इंटरनॅशनलचे उपाध्यक्ष चैतन्य चिंचीलकर, प्रोड्युसर्स गिल्ड ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन आहुजा, मोशन पिक्चर्स असोसिएशनच्या वरिष्ठ संचालिका लोहिता सुजीत, चित्रपट अभिनेता आणि दिग्दर्शक शिवराज वायचळ यांनी आपली भूमिका मांडली.
-----
विनापरवाना चित्रीकरण
मुंबई पालिकेंतर्गत निसर्गसौंदर्यांनी नटलेले तलाव, शाळा, रुग्णालये, कचरा क्षेपणभूमी आदी आस्थापना आहेत. अशा ठिकाणी कोणत्याही परवानगीविना चित्रीकरण करता यावे, यासाठी महापालिकेच्या वतीने उपाययोजना केल्या जात असल्याचे आयुक्त गगराणी म्हणाले.
---
फोटो - MUM25F00437

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com