ऐरोलीतील नवीन उद्यानाची पुन्हा ४० लाखांची निविदा

ऐरोलीतील नवीन उद्यानाची पुन्हा ४० लाखांची निविदा

Published on

ऐरोलीतील नवीन उद्यानाची पुन्हा ४० लाखांची निविदा

चार अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. ३० ः महापालिकेच्या ऐरोली येथील उद्यानाचे गरज नसतानाही नूतनीकरणाचे काम काढल्याप्रकरणी आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी चार अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. यामध्ये एका अधिकाऱ्याला निलंबित केले असून उर्वरित अधिकाऱ्यांची सात दिवसांमध्ये कारणे दिल्यानंतर विभागीय चौकशी होण्याची दाट शक्यता आहे.

ऐरोली सेक्टर १० येथे महापालिकेने यशवंतराव चव्हाण उद्यान उभारलेले आहे. या उद्यानाचे नव्याने तयार केलेल्या भूमिगत गटाराची उंची वाढल्याने पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यात अडथळा निर्माण झाला होता. त्यामुळे उद्यानाची उंची वाढवून हिरवळ, झाडे, माती टाकण्याकरिता ४५ लाख रुपयांचे काम प्रस्तावित करण्यात आले; मात्र प्रस्तावित कामांसाठी २८ मार्च २०२४ला केलेल्या पाहणीनुसार उद्यानाचे काम आधीच दुसऱ्या कंत्राटदारामार्फत करीत असल्याचे निदर्शनास आले. उद्यानाचे लोखंडी प्रवेशद्वार, धावण्याकरिता पदपथ, उद्यानातील खेळणी व व्यायामाचे साहित्य आदी सुस्थितीत असल्याचे समोर आले. उद्यानाची भिंत सुस्थितीत असून रंगरंगोटी करता येईल, एवढेच काम होते. उद्यानातील पाण्याचा निचरा होत नसल्याचे दाखवून लाल माती, मुरूम भरणा करून उंची वाढवणे, शोभिवंत झुडुपे व हिरवळ नव्याने तयार करण्याची गरज नसल्याचे पाहणीदरम्यान उघडकीस आले. तसेच उद्यानात सेल्फी पॉइंट उभारणे, फुलझाडे लावणे व मोठ्या वृक्षांची लागवड करणे, ही सर्व कामे याआधी दिलेल्या उद्यानाच्या देखभाल दुरुस्तीमध्ये अंतर्भूत असल्याने ती करण्याची गरजदेखील नसल्याचे समोर आले. याप्रकरणी उद्यान व वृक्ष प्राधिकरणाच्या लेखाविषयक काम करणाऱ्या अधिकाऱ्याने कोणत्याही टप्प्यावर आक्षेप नोंदवला नाही. त्यामुळे डॉ. कैलास शिंदे यांनी उद्यान विभागातील तीन अभियंते आणि एक लिपिकाला कारणे दाखवा नोटीस दिली आहे.

बदलीनंतर कारवाई का?
तत्कालीन उपायुक्त दिलीप नेरकर यांना उद्यान विभागातील गरज नसतानाही आणि याआधी केलेल्या कामाचे पुन्हा काम काढल्याप्रकरणी नोटीस बजावली आहे; मात्र नेरकर यांची महापालिकेतून बदली झाली असून बदली झाल्यानंतर महापालिकेला हे शहाणपण का सुचले, अशी चर्चा महापालिका वर्तुळात सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com