खोपोलीमधील अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था
खोपोलीतील अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था
आगामी उत्सवांपूर्वी खड्डे बुजविण्याची मागणी
खोपोली, ता. ३१ (बातमीदार) : पावसाळा सुरू होताच खोपोली नगर परिषद हद्दीतील रस्त्यांची दुरवस्था चव्हाट्यावर आली असून, विशेषतः लौजी-चिंचवली डीपी रोड आणि शहरातील अंतर्गत रस्ते खड्ड्यांनी भरले आहेत. त्यामुळे वाहतूक विस्कळित होऊन नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. यामुळे गणेशोत्सव, गोपाळकाला व नवरात्र यांसारख्या आगामी सण-उत्सवांपूर्वी रस्त्यांची डागडुजी तातडीने करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
नगरपालिकेने मे व जूनच्या पहिल्या आठवड्यात लाखो रुपयांचा निधी खर्च करून रस्त्यांची डागडुजी केली होती; मात्र ही कामे अत्यंत निकृष्ट दर्जाची झाल्याचा आरोप माजी नगरसेवक व सामाजिक कार्यकर्त्यांकडून करण्यात आला होता. दुर्दैव म्हणजे या आरोपांकडे प्रशासनाने दुर्लक्ष करीत घाईगडबडीत कामे उरकली आणि आता पुन्हा तेच रस्ते खड्ड्यांनी पोखरले गेले आहेत. सणांच्या पार्श्वभूमीवर रस्त्यांची दुरुस्ती करणे अत्यंत गरजेचे आहे, अन्यथा नागरिकांचा उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. सध्या खड्ड्यांमुळे दुचाकीस्वारांचे अपघात वाढले असून, विद्यार्थ्यांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनाच त्रास सहन करावा लागत आहे.
............
या पार्श्वभूमीवर खोपोली नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले, की खड्डे बुजवण्यासाठी तातडीने कारवाईचे आदेश दिले आहेत. यामध्ये आयआरबी अधिकाऱ्यांशी समन्वय साधून आधुनिक पद्धतीने रेडिमेड डांबर व बारीक खडीचे मिश्रण वापरण्यात येणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.