कर्जतमध्ये महावितरणने ट्रान्सफॉर्मर बसवला;
कर्जतमध्ये महावितरणने ट्रान्स्फॉर्मर बसवला
वीजग्राहक संघर्ष समितीच्या आंदोलनाला यश
कर्जत, ता. ३१ (बातमीदार) ः कर्जत शहरातील महावीर पेठ परिसरात गेल्या अनेक महिन्यांपासून नागरिकांना लो व्होल्टेजच्या समस्येला सामोरे जावे लागत होते. घरगुती वापरातील उपकरणांचे नुकसान, लाइटची अकार्यक्षमता आणि वारंवार वीज खंडित होणे यामुळे नागरिक त्रस्त झाले होते. या प्रश्नाकडे वेळोवेळी महावितरण प्रशासनाचे लक्ष वेधूनही तो मार्गी लागत नव्हता, मात्र कर्जत वीजग्राहक संघर्ष समितीच्या सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अखेर महावितरणने तातडीने उपाययोजना राबवत उच्च क्षमतेचा ट्रान्स्फॉर्मर बसवला आहे.
या भागात यापूर्वी केवळ १०० केव्ही क्षमतेचा ट्रान्स्फॉर्मर कार्यरत होता, मात्र वाढती लोकवस्ती आणि वीज वापराच्या प्रमाणात तो अपुरा ठरत होता. परिणामी, घरांमध्ये इलेक्ट्रॉनिक उपकरणे नीट चालत नव्हती. कधी दिवे मंद पेटत, तर कधी पंखे फिरतच नसत. याचा थेट परिणाम नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर होत होता. त्यामुळे कर्जत वीजग्राहक संघर्ष समितीच्या माध्यमातून सातत्यपूर्ण पाठपुरावा करण्यात आला. अखेर महावितरणचे उपअभियंता चंद्रकांत केंद्रे यांनी याबाबत सक्रिय पावले उचलली. कर्जत वीजग्राहक संघर्ष समितीच्या ऑगस्ट २०२४ मधील आंदोलनानंतर हा विषय अधिक गांभीर्याने घेतला गेला. कार्यकारी अभियंता शिंदे (पनवेल), अभियंता ठाकूर आणि केंद्रे यांच्या समन्वयाने महावीर पेठ येथे २०० केव्ही क्षमतेचा नवा ट्रान्स्फॉर्मर यशस्वीरित्या कार्यान्वित करण्यात आला. या कामाच्या उद्घाटनप्रसंगी अॅड. कैलास मोरे, रंजन दातार, दीपक बेहेरे, राजेश लाड, राजाभाऊ कोठारी, अशोक ओसवाल, रोहित ओसवाल, रोहित बाफना आदी पदाधिकारी उपस्थित होते. स्थानिक नागरिकांनी या वेळी समाधान व्यक्त करत महावितरण अधिकाऱ्यांचे आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.