भिवंडीतील डांबरी रस्ते गायब भिवंडीतील डांबरी रस्ते गायब

भिवंडीतील डांबरी रस्ते गायब
भिवंडीतील डांबरी रस्ते गायब
Published on

भिवंडीतील डांबरी रस्ते गायब
निकृष्ट कामामुळे जागोजागी खड्डे; अपघाताची भीती

भिवंडी, ता. ३१ (बातमीदार) : शहरातील मुख्य रस्त्यांसह अनेक ठिकाणी अंतर्गत रस्ते सिमेंट काॅंक्रीटीकरण केले जात आहेत. एमएमआरडीएच्या निधीतून शहरातील ८० टक्क्यांहून अधिक भागातील रस्त्यांचे सिमेंट काॅंक्रीटीकरण केले जात आहेत, परंतु शहरात उर्वरित २० टक्के डांबरी रस्ते महापालिकेकडून दुरुस्त केले जात नाहीत. त्यामुळे शहरातील विविध अंतर्गत रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडल्याने रस्ते जीवघेणे बनले आहेत. पावसाळ्याच्या आगमनापूर्वी शहरातील अनेक रस्त्यांची दुरुस्ती आणि डांबरीकरण केले; मात्र निकृष्ट दर्जाच्या कामामुळे पाऊस सुरू होताच या रस्त्यांचे डांबर वाहून जात आहेत. तसेच त्या ठिकाणी मोठमोठे खड्डे होतात. गेल्या अनेक वर्षांपासून शहरातील नागरिक हे खड्डे सहन करीत आहेत, तर गेल्या वर्षांपासून शहरात सिमेंट रस्ते बनवतानाही ठेकेदार निकृष्ट दर्जाचे काम करत आहेत. सिमेंट केलेले रस्ते आणि त्याशेजारी लावलेले पेव्हर ब्लॉक यांच्यातील अंतर मोठे आहे. तसेच रस्त्याचे काम अपूर्ण असल्यानेही अपघात होत आहेत.

शहरातील शांतीनगरला जाण्यासाठी कल्याण रस्त्यावरील नवी बस्तीसमोरून अप्सरा टॉकीजच्या मागच्या बाजूने बाबला कंपाउंड रस्त्याने जाता येते, परंतु कल्याण रोड ते बाबला कंपाउंड रोडवरील गणेश सोसायटीपर्यंतचा रस्ता बेवारस अवस्थेत पडला आहे. गेल्या सात-आठ वर्षांपासून या रस्त्यावर कोणतेही काम झालेले नाही. हा संपूर्ण रस्ता खड्ड्यांनी भरलेला आहे. सुभाष नगर पोलिस ठाण्यासमोरील खड्ड्यांमुळे रस्त्यावरून चालणे कठीण झाले आहे. सुभाष नगर ते अमजदिया शाळेपर्यंत सिमेंटचा रस्ता बांधण्याचे काम स्थानिक आमदार रईस शेख यांनी दिलेल्या निधीतून केले जात आहे, परंतु रस्त्याचे काम अतिशय संथ गतीने सुरू आहे. अनेक ठिकाणी रस्ता अपूर्ण असल्याने येथील नागरिकांसाठी समस्या बनली आहे.

दुर्गंधीयुक्त पाण्याने विद्यार्थी त्रस्त
अनमोल हॉटेल ते नमस्ते हॉटेलपर्यंत ६० फुटी सिमेंटचा रस्ता बांधला आहे. पण नमस्ते हॉटेलच्या पुढे डांबरी रस्ता आहे. परंतु गेल्या अनेक वर्षांपासून रस्त्याची दुरुस्ती न झाल्याने रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. पाण्याचा निचरा करण्याची कोणतीही व्यवस्था नसल्याने रस्त्यावर दुर्गंधीयुक्त पाणी साचते. या घाण पाण्यातून व चिखलातून शिक्षण घेणाऱ्या लहान मुलांना जावे लागते. तिथल्या एका शिक्षकाने सांगितले की, पालक दररोज शाळेत येतात आणि रस्त्यावर साचलेल्या पाण्याबद्दल तक्रार करतात.

नरकमय प्रवास
नागाव ते शांतीनगर रस्त्याची अवस्था खूपच वाईट आहे. कल्याण रोड-असाबीबी मशिदीजवळ खदान रोडवर इतके खड्डे आहेत की त्यावरून धक्के खात चालावे लागते. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे असल्याने अनेक दुचाकीस्वारांना पाठ आणि मणक्याचे दुखणे जडले आहे. या रस्त्यावरून खोखा कंपाउंडकडे जाणारा रस्ता तर दिसत नाही. येथील संपूर्ण रस्ता खड्ड्यात बदलला आहे. पावसाळ्यात त्याच खड्ड्यांमध्ये पडलेल्या कचऱ्यातूनही दुर्गंधी येत राहते. येथून येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांना एका नरकमय प्रवासाचा सामना करावा लागतो.

महापालिका पूर्णपणे अपयशी ठरली आहे. रस्त्यांची अवस्था खूपच वाईट आहे. महापालिका निरुपयोगी झाली आहे. राज्य सरकारने निधी उपलब्ध करून देऊनही, महापालिका काम पूर्ण करू शकलेली नाही. शहरातील बहुतेक रस्ते राज्य सरकारने दिलेल्या निधीतून बांधले जात आहेत, पण महानगरपालिका उर्वरित रस्त्याचीही दुरुस्ती करू शकत नाही.
- रईस शेख, आमदार, भिवंडी पूर्व

महापालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे भिवंडीतील लोक खड्ड्यांमध्ये आपले जीवन व्यतीत करत आहेत. येथील रस्त्यांवर वर्षानुवर्षे खड्डे आहेत. तसेच अपघातांमुळे एखादा गंभीर जखमी होऊ शकतो. - दीपक गुप्ता - ट्रान्सपोर्टर, खदान रोड

भिवंडीतील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे येथील लोकांचा प्रवास खूप त्रासदायक झाला आहे. बघायला कोणी नाही, तर शहरातील महान नगरसेवक, आमदार आणि खासदार तसेच महापालिकेचे अधिकारी यासह कार्यरत सम्राटदेखील याच रस्त्यांवरून प्रवास करतात, पण त्यामुळे त्यांच्या आरोग्यावर काहीही फरक पडत नाही.
- अब्दुल जलील अन्सारी - सामाजिक कार्यकर्ते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com