आकर्षक राख्यांची महिलांना भुरळ
आकर्षक राख्यांची महिलांना भुरळ
रक्षाबंधनानिमित्त बाजारपेठ सजली
तुर्भे, ता. ३ (बातमीदार) ः रक्षाबंधनाचा सण अवघ्या काही दिवसांवर आला असून, त्याचे स्वागत करण्यासाठी बाजारपेठा सजल्या आहेत. बहीण-भावाच्या प्रेमाचे प्रतीक असलेल्या राख्यांमध्ये यंदा नव्या आणि आकर्षक प्रकारांचे वर्चस्व पाहायला मिळत आहे. विशेषतः महिलांमध्ये ‘लूंबा राखी’ या खास प्रकारच्या राखीने मोठी क्रेझ निर्माण केली आहे.
लूंबा राखी ही पारंपरिक राखी असून, ती वहिनीच्या हाताला बांधली जाते. ही राखी भावाच्या हातावर बांधलेल्या राखीसोबत जोडलेली असते. त्यामुळे ही राखी केवळ भाऊ-बहिणीच्या नात्याचेच नव्हे, तर भाऊ-वाहिनीच्या आपुलकीचेही प्रतीक ठरते. यंदा ही राखी पारंपरिकतेला आधुनिकतेची जोड देत अधिक आकर्षक डिझाइनमध्ये बाजारात दाखल झाली आहे. स्टोन, मोती, रुद्राक्ष, झिरकॉनीया, संगीत वाजणाऱ्या राख्या, तसेच डिझायनर लटकनसह लूंबा राखीचे आकर्षक सेट मोठ्या संख्येने ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत. काही लूंबा राख्या दागिन्यांसारख्या भासतात आणि त्या नंतरही वापरता येतात, ही बाब महिलांना अधिक भावते आहे. राखी खरेदीसाठी शहरातील मुख्य बाजारपेठांमध्ये गर्दी होत असून, महिलांचा कल वेळेत राखी पोहोचवण्यासाठी लवकर खरेदी करण्याकडे वाढत आहे. परदेशात किंवा शहराबाहेर असलेल्या भावांना राखी पाठवण्यासाठी आधीच खरेदीला सुरुवात झाली आहे.
...............
चिमुकल्यांसाठी छोटा भीम, डोरेमॉन, मोटू पतलू, श्रीकृष्ण आणि श्रीगणेशाच्या राख्यांची विशेष आवड असून, लायटिंग राख्यांमध्ये यंदा स्पिनर लायटिंग विशेष लक्ष वेधून घेत आहे. यामध्ये बटण दाबल्यावर विविध रंगीत लाइट्स चमकतात. कपल राख्या म्हणजे महिला आणि पुरुष दोघांसाठी एकत्रित राख्याही यंदा लोकप्रिय ठरत आहेत. शहरात विविध भागांत अस्थायी दुकाने उघडली गेली असून, साध्या, फॅन्सी, पारंपरिक, चांदी पॉलिश आणि ब्रॅन्डेड राख्यांपासून राख्यांची श्रेणी उपलब्ध आहे. किमतीत पाच रुपये ते ५०० रुपयांपर्यंतचा फरक असून, प्रत्येकाची आवडनिवड लक्षात घेऊन व्यापाऱ्यांनी विविध राख्या बाजारात आणल्या आहेत.
राखींचे प्रकार व किमती (रु. मध्ये):
प्रकार किंमत
साधी लायटिंग राखी ५० ते ८०
लाकडी उडन राखी ४० ते ७०
कुंदन वर्क ३० ते १५०
मोती राखी १० ते ७०
लूंबा राखी ४० ते २५०
कपल राखी ४० ते १००
पपेट राखी ५० ते ९०
कडा राखी १०० ते २५०
चांदी पॉलिश राखी २०० ते ५००
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.