श्रीमलंगगडाच्या पायथ्याशी आगरी साहित्य संमेलन
श्रीमलंगगडाच्या पायथ्याशी आगरी साहित्य संमेलन
संमेलनाध्यक्षपदी लोककवी अरुण म्हात्रे, स्वागताध्यक्षपदी डॉ. सोन्या पाटील यांची निवड
कल्याण, ता. ३१ (वार्ताहर) ः आगरी भाषेच्या समृद्ध साहित्यिक परंपरेचा गौरव आणि नवोदित लेखक, कलाकार, कवी यांना एक व्यासपीठ मिळवून देण्यासाठी गायक-गीतकार दया नाईक, आगरी संस्कृती अभ्यासक मोरेश्वर पाटील, युवा साहित्यिक सर्वेश तरे, चित्रकार प्रकाश पाटील यांनी आगरी ग्रंथालय चळवळ संस्थेची स्थापना केली. आगरी ग्रंथालय चळवळीच्या मार्फत ‘सरावनसरी २०२५’ - तिसऱ्या आगरी साहित्य संमेलनाचे आयोजन १७ ऑगस्ट रोजी श्रीमलंगगड पायथ्याशी जोशीबाग येथे केले आहे.
संमेलनाचे आयोजन आगरी ग्रंथालय चळवळ आणि समाजकल्याण न्यास यांच्या वतीने करण्यात येत आहे. स्वागताध्यक्ष म्हणून धर्मसेवक सोन्या पाटील यांची निवड झाली आहे. तर संमेलनाध्यक्षपदी सुप्रसिद्ध लोककवी अरुण म्हात्रे हे सूत्रधार म्हणून मार्गदर्शन करणार आहेत. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी नऊ वाजता ग्रंथदिंडी, दीपप्रज्वलन, सरस्वतीपूजन आणि गुरूवंदना या पारंपरिक पद्धतीने होणार आहे. यानंतर संमेलनात विविध विषयांवर आधारित सत्रे पार पडणार आहेत.
संमेलनात पहिल्यांदाच भाषाप्रभू हभप जगन्नाथ महाराज पाटील यांचे आगरी भाषेत प्रवचन होणार आहे. साहित्य संमेलनात आगरी कथा अभिवाचन संजीवन म्हात्रे, मयुरेश कोटकर, प्रकाश पाटील यांच्यासह अनेक मान्यवर लेखकांचा सहभाग असून व आगरी खुले कविसंमेलनसुद्धा भरणार आहे. सामाजिक चर्चासत्रामध्ये समाजातील चालू घडामोडींवर चर्चा होणार आहे. यामध्ये सी.ए. नीलेश पाटील, सुशांत पाटील, सर्वेश तरे आदी सहभागी होणार आहेत.
शिवव्याख्याते ॲड. विवेक भोपी यांचे आगरी समाजाच्या ऐतिहासिक बाबींवर ‘आगऱ्यांच्या शौर्यगाथा’ हे विशेष व्याखान होणार आहे. सोबत पारंपरिक फेऱ्यांची गाणी, लोककलाकार दिवंगत काशिराम चिंचय (वेसावकर मंडळी) यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी गायक संतोष चौधरी (दादूस), जगदीश पाटील, किसन फुलोरे, चंद्रकला दासरी, संगीता पाटील आदी कलाकार सहभागी होणार असून, दिवंगत काशिराम चिंचय यांना मरणोत्तर आगरी-कोळी रत्न पुरस्कार वितरण होणार आहे.
संमेलनात प्रवेश मोफत
संमेलनात स्थानिक लोककलावंत, साहित्यिक, समाजसेवक आणि तरुण पिढीचा उत्स्फूर्त सहभाग अपेक्षित आहे. संपूर्ण दिवसभर चालणाऱ्या या संमेलनात आगरी भाषा, परंपरा, संस्कृती आणि इतिहास यांचे दर्शन घडवणारे विविध कार्यक्रम होणार आहेत. हे संपूर्ण आयोजन मोफत आणि सर्वांसाठी खुले असल्याची माहिती आगरी ग्रंथालय चळवळीचे संस्कृती अभ्यासक चित्रकार मोरेश्वर पाटील यांनी दिली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.