पट्टा

पट्टा
Published on

पावसाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यावर तज्ज्ञांचा उपक्रमातून भर
वाशी (बातमीदार) ः पावसाळा काळात सर्दी-खोकला, ताप, डेंग्यू, मलेरिया, टायफॉइडसारखे आजार वाढतात. अशावेळी शरीराची प्रतिकारशक्ती मजबूत ठेवणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. याच पार्श्वभूमीवर डाबर इंडिया या आयुर्वेदिक उत्पादन कंपनीच्या वतीने कोपरखैरणे येथील साई होली फेथ स्कूल येथे आरोग्यविषयक जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात नगरसेवक केशव अंकल, समाजसेविका बेबी लांडगे, शाळेच्या मॅनेजिंग डायरेक्टर साधना सिंग, प्राचार्या स्मिता शर्मा आणि डाबर इंडियाचे दिनेश कुमार उपस्थित होते. या कार्यक्रमात पावसाळ्यात आरोग्याची विशेष काळजी घेण्याची गरज व्यक्त झाली. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आयुर्वेदिक तत्त्वांवर आधारित जीवनशैली, योग्य आहार आणि नैसर्गिक उपाय यावर भर देण्यात आला.
सससससससससससससससससससस
जुईनगरमध्ये ज्येष्ठांसाठी निवारा शेडची उभारणी
जुईनगर (बातमीदार) : जुईनगर सेक्टर २४ येथील महालक्ष्मी सोसायटीजवळ निवारा शेड उभारण्यात आले आहे. त्यामुळे जुईनगरमधील अबालवृद्धांसाठी हे निवारा शेड आधार बनले आहे. या परिसरात विद्यार्थी, गरोदर महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना निवारा शेडची गरज असल्याचे सांगण्यात येत होते. त्यामुळे माजी नगरसेवक विशाल ससाणे यांच्या माध्यमातून या शेडची उभारणी करण्यात आली. शिवसेना उबाठा गट जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील यांच्या हस्ते या निवारा शेडचे उद्घाटन करण्यात आले.
याप्रसंगी उपजिल्हाप्रमुख मनोज इसवे, विभागप्रमुख राजेश पोसम, शाखाप्रमुख राजेश पुजारी, मंगेश मोहिते, ज्येष्ठ नागरिक संस्थेचे पदाधिकारी भारत कवडे, युवती सेना उपजिल्हा संघटिका पौर्णिमा ससाणे, ज्येष्ठ नागरिक, महिला व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स*स*स*स*स*स*स*स*स*स*
जुईनगरमध्ये दंत चिकित्सा शिबिर
जुईनगर, ता. ३१ (बातमीदार) : जुईनगरमधील श्री स्वामी समर्थ मठात गुरुवारी (ता. ३१) मोफत दंत चिकित्सा शिबिर पार पडले. खारघर येथील डॉ. डी. जी. पोळ फाउंडेशनचे वायएमटी दंत महाविद्यालय आणि रुग्णालयातर्फे हे शिबिर भरविण्यात आले आहे. सामाजिक दंतशास्त्र विभागाच्या सहा डॉक्टरांची टीम या वेळी उपस्थित होती. फाउंडेशनच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त रुग्णालयामार्फत नवी मुंबईत पनवेलपासून दिघ्यापर्यंत विविध ठिकाणी ही शिबिरे राबवण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. या वेळी शेकडो नागरिकांनी सकाळपासून शिबिरात सहभागी होऊन आपली दंतचिकित्सा करून घेतली. तसेच तपासणीव्यतिरिक्त काही उपचार असल्यास येथील रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात बोलावून उपचार करण्यात येणार असल्याचे येथील डॉक्टरांनी सांगितले.
९९९९९९९९९९९९९९९९९९
आगरी कोळी शिल्पाची रंगरंगोटी करण्याची मागणी
नेरूळ, ता. ३१ (बातमीदार) ः आगरी कोळी बांधवांचा मान ठेवून पामबीच मार्गालगत सुंदर असे शिल्प उभारण्यात आले आहे, परंतु सद्य:स्थितीत या शिल्पावरील रंगकाम उडालेले असल्याचे दिसत आहे. आगरी कोळी बांधवांचा नारळी पौर्णिमा हा सण शुक्रवार (ता. ८) येत असून, या वेळी सर्व बांधव एकत्र येऊन सारसोळे कोळीवाडा ते जेट्टीपर्यंत मिरवणूक काढून समुद्राला नारळ अर्पण करतात. यामुळे नेरूळ पामबीच मार्गालगत आगरी कोळी संस्कृती दाखविण्यात आलेल्या शिल्पाची नारळीपौर्णिमेपूर्वी रंगरंगोटी करण्याची मागणी युवासेना विभाग अधिकारी शिवसेना ठाकरे सस्मित भोईर यांनी सहाय्यक आयुक्त तथा विभाग अधिकारी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
स*स*स*स*स*स*स*स*स*स*स*स*
कौशल्यविषयक प्रशिक्षण उपक्रमांतून देहविक्रय करणाऱ्या महिलांसाठी विकासाच्या नव्या संधी
नेरूळ, ता. ३१ (बातमीदार) ः उपजीविकेसाठी देहविक्रय करणाऱ्या महिलांचे सक्षमीकरण करण्याच्या दृष्टीने नवी मुंबई महापालिकेच्या समाजविकास विभागामार्फत विशेष कौशल्यविषयक प्रशिक्षण कार्यक्रमाची सुरुवात केली आहे. या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
या उपक्रमांतर्गत महिलांना विविध कौशल्य विकासाचे प्रशिक्षण, डिजिटल साक्षरता तसेच उपजीविकेची पर्यायी साधने याबाबत मार्गदर्शन केले जात आहे. त्यास अनुसरून अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेमार्फत तुर्भे विभागातील देहविक्रय महिलांना मेहंदी, ब्युटीशियन व शिवणकामाचे प्रशिक्षण दिले जात आहे. या प्रशिक्षणाकरिता क्षमता या स्वयंसेवी संस्थेचा सहयोग लाभला आहे. सध्या यामध्ये ६१ महिला सहभागी झाल्या आहेत. पालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार समाजविकास विभागामार्फत महिला विकासांतर्गत हे प्रशिक्षण देहविक्रय करणाऱ्या महिलांसाठी एक नवा व प्रगतिशील असा महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार आहेत.
स*स*स*स*

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com