साध्वी प्रज्ञासिंह, पुरोहितसह सात जणांची पुराव्याअभावी निर्दोष सुटका

साध्वी प्रज्ञासिंह, पुरोहितसह सात जणांची पुराव्याअभावी निर्दोष सुटका

Published on

साध्वी प्रज्ञासिंह, पुरोहितसह सात जणांची पुराव्याअभावी निर्दोष सुटका
मालेगाव बॉम्बस्फोट खटला; विशेष न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३१ ः मालेगाव येथे २९ सप्टेंबर २००८ रोजी झालेल्या बॉम्बस्फोटांशी संबंधित बहुप्रतीक्षित खटल्याचा निकाल राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) कायद्यांतर्गत विशेष न्यायालयाने गुरुवारी (ता. ३१) दिला. त्यात साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांच्यासह मेजर रमेश उपाध्याय (निवृत्त), अजय राहीरकर, सुधाकर द्विवेदी, सुधाकर चतुर्वेदी आणि समीर कुलकर्णी यांची पुराव्याअभावी निर्दोष सुटका केली. आरोप सिद्ध करण्यास तपास यंत्रणा अपयशी ठरल्याचे तसेच आरोपींविरोधातील विश्वसनीय आणि ठोस पुराव्यांचा अभाव असल्याचे निरीक्षणही न्यायालयाने नोंदवले.

बॉम्बस्फोट झाला, मात्र मोटारसायकलमध्ये झाला हे सिद्ध करण्यात सरकारी पक्षाला अपयश आले. आरडीएक्स प्रसाद पुरोहितने आणले हे सिद्ध होऊ शकलेले नाही. त्याच्याविरुद्धचे आरोप सिद्ध झाले नाहीत. ज्या ठिकाणी बॉम्बस्फोट झाला त्या ठिकाणाहून वैज्ञानिक पुरावे जमा केले गेले नाहीत. साध्वीच्या मोटारसायकलमध्ये बॉम्बस्फोट झाल्याचा आरोप; पण ही मोटारसायकल तिच्या मालकीची असल्याचे सिद्ध करण्यास तपास यंत्रणांना अपयश आल्याचे आरोपींची सुटका करताना विशेष न्यायालयाचे न्यायाधीश ए. के. लाहोटी यांनी स्पष्ट केले.

सात वर्षांच्या प्रदीर्घ सुनावणीनंतर १९ एप्रिल २०२५ रोजी फिर्यादी आणि आरोपींचा युक्तिवाद पूर्ण झाल्याचे जाहीर करून खटल्याचा निर्णय राखून ठेवला होता. तो निकाल विशेष न्यायालयाने गुरुवारी जाहीर केला. खटल्याचा निकाल देताना न्यायालयाने तपासातील त्रुटींवर बोट ठेवले.  मालेगाव येथील मुस्लिम समुदायात दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने उजव्या विचारसरणीच्या दहशतवाद्यांनी हा स्फोट घडवून आणल्याचा सरकारी पक्षाचा आरोप होता. तथापि, साध्वी प्रज्ञासिंह, पुरोहित यांच्यासह निवृत्त मेजर रमेश उपाध्याय, अजय राहीरकर, सुधाकर द्विवेदी, सुधाकर चतुर्वेदी आणि समीर कुलकर्णी या सात आरोपींनी हा बॉम्बस्फोट घडवल्याचे सिद्ध करण्यात सरकारी पक्ष अपयशी ठरला. सरकारी पक्षाने सादर केलेल्या एकूण पुराव्यांचा विचार करता, त्या आधारावर आरोपींना दोषी ठरवू शकत नाही. हे पुरावे विश्वासार्ह नाहीत, असे निरीक्षणही न्यायालयाने नोंदवले.
 ...
प्रकरण काय?
मुंबईपासून सुमारे २०० किमी अंतरावर असलेल्या मालेगाव येथील मशिदीजवळ २९ सप्टेंबर २००८ रोजी मोटारसायकलमध्ये ठेवण्यात आलेल्या बॉम्बचा स्फोट होऊन सहा जण ठार आणि १००हून अधिक जखमी झाले होते. देशातील दहशतवादाशी संबंधित दीर्घकाळ चाललेल्या खटल्यांपैकी हा एक खटला आहे. विशेष न्यायालयाने साध्वी प्रज्ञासिंह आणि पुरोहित यांच्यासह प्रकरणातील अन्य आरोपींवर बेकायदा कारवाया प्रतिबंधक कायदा, भारतीय दंड विधान आणि शस्त्रास्त्र कायदा अशा महत्त्वाच्या कायद्यांतर्गत दहशतवादाच्या आरोपाप्रकरणी खटला चालवला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com