एलटीटी-मडगावदरम्यान ६ अतिरिक्त गणपती विशेष गाड्या, एकूण संख्या ३०२ वर

एलटीटी-मडगावदरम्यान ६ अतिरिक्त गणपती विशेष गाड्या, एकूण संख्या ३०२ वर

Published on

एलटीटी-मडगावदरम्यान सहा अतिरिक्त गणपती विशेष
चाकरमान्यांना दिलासा; गणेशोत्सवासाठी गाड्यांची संख्या ३०२ वर
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३१ : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांची वाढती गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेने आणखी सहा गणपती विशेष गाड्यांचे नियोजन केले आहे. याआधी जाहीर करण्यात आलेल्या २९६ गाड्यांव्यतिरिक्त आता सहा गाड्या वाढवण्यात आल्या असून, गणपती विशेष गाड्यांची एकूण संख्या ३०२ झाली आहे. या गाड्यांमुळे मुंबई आणि कोकणदरम्यानच्या प्रवासात चाकरमान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
या विशेष गाड्या लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) आणि मडगावदरम्यान साप्ताहिक स्वरूपात चालवण्यात येणार आहेत. ट्रेन क्रमांक ०१००३ लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सोमवार, २५ ऑगस्ट, १ आणि ८ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ८.२० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री १०.४० वाजता मडगावला पोहोचेल. तसेच, गाडी क्रमांक ०१००४ मडगाव येथून रविवार, २४, ३१ ऑगस्ट व ७ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेचार वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल.
ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम आणि करमाळी येथे या गाड्यांचे थांबे असणार आहेत.

५ ऑगस्टपासून आरक्षण सुरू
या गाड्यांमध्ये एक वातानुकूलित द्वितीय श्रेणी, तीन वातानुकूलित तृतीय श्रेणी, दोन इकॉनॉमी एसी तृतीय श्रेणी, आठ शयनयान, चार सामान्य द्वितीय श्रेणी, एक द्वितीय आसनयुक्त गार्ड ब्रेक व्हॅन आणि एक जनरेटर व्हॅन अशी डब्यांची जोडणी आहे. या गणपती विशेष गाड्यांचे आरक्षण ५ ऑगस्ट २०२५ पासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर तसेच आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर सुरू होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com