सर्वोच्च न्यायालयात दाद मागू!

सर्वोच्च न्यायालयात दाद मागू!

Published on

सर्वोच्च न्यायालयात दाद मागू!

स्फोटातील पीडितांची निकालानंतर प्रतिक्रिया

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३१ : मालेगाव बॉम्बस्फोटासंदर्भात एनआयए विशेष न्यायालयाचा निकाल अस्विकार्य आहे. गरज पडल्यास न्याय मिळवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयातही दाद मागू, असे या दुर्घटनेतील सर्वात लहान पीडित फरहीन (१०) हिच्या वडिलांनी गुरुवारी सांगितले.
तत्कालीन एटीएस प्रमुख हेमंत करकरे यांनी पुरेशा पुराव्यांसह आरोपींना अटक केली होती; तरीही आरोपीची सुटका होते. त्यामुळे आम्हाला न्यायालयाचा निर्णय मान्य नाही. आम्ही न्याय मिळवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात जाऊ, असे ६७ वर्षीय लियाकत शेख यांनी सांगितले. वाहनचालक म्हणून काम करणारे शेख यांची अल्पवयीन मुलगी फरहीन २९ सप्टेंबर २००८ रोजी संध्याकाळी भिक्खू चौकात वडापाव खरेदी करण्यासाठी घराबाहेर पडली होती. त्याचवेळी भयंकर मोठा स्फोटाचा आवाज झाला. आम्ही त्या घटनास्थळावर पोहोचलो असता मी माझ्या मुलीला शोधण्याचा प्रयत्न केला; परंतु ती सापडली नाही. कोणीतरी जखमींमध्ये एक मुलगी असल्याचे सांगितले. मी आणि माझ्या पत्नीने रुग्णालयात धाव घेतली, जिथे आम्हाला ती वाईट परिस्थितीत आढळल्याचे घटनेची आठवण करून देताना शेख यांनी सांगितले.
स्फोटात लियाकत शेख यांच्या मुलीसह सहा जणांचा मृत्यू झाला आणि १०१ जण जखमी झाले. दुसरीकडे निसार अहमद, ज्यांचा मुलगा सय्यद अझहर मृतांपैकी एक होता. त्यांनी आपल्याला न्याय मिळाला नाही. त्यामुळे आपण उच्च न्यायालयात या निर्णयाला आव्हान देणार असल्याचे सांगितले. या स्फोटात रिक्षाचालक इरफान खानचाही (२२) मृत्यू झाला होता. इरफान ऑटो रिक्षा चालवत होता आणि भिक्खू चौकात चहा घेण्यासाठी बाहेर गेला असताना स्फोट झाला आणि त्याचा मृत्यू झाल्याचे त्याच्या काकाने सांगितले. तसेच आपण या निर्णयावर समाधानी नसल्याचेही नमूद केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com