कल्याण पूर्वेत मंगळवारी पाणीबाणी

कल्याण पूर्वेत मंगळवारी पाणीबाणी

Published on

कल्याण पूर्वेत मंगळवारी पाणीबाणी
डोंबिवली, ता. १ : कल्याण पूर्वेतील पाणीपुरवठा मंगळवारी (ता. ५) आठ तास बंद राहणार आहे. पाणीपुरवठा करणाऱ्या वितरण व्यवस्थेचे देखभाल दुरुस्तीचे काम पालिका प्रशासनाकडून करण्यात येणार आहे. यामुळे मंगळवारी सकाळी १० ते सायंकाळी सहा या वेळेत पाणीपुरवठा प्रशासनाकडून बंद ठेवण्यात येणार आहे. कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील कल्याण पूर्व परिसरातील पाणीपुरवठा वितरण व्यवस्थेतील देखभाल दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. यामुळे बारावे जलशुद्धीकरण केंद्रामधून मंगळवारी आठ तासांसाठी महापालिका क्षेत्रातील कल्याण पूर्व परिसराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. नागरिकांनी पाण्याचा साठा करून ठेवावा व पाणी जपून वापरावे, असे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Marathi News Esakal
www.esakal.com