आंतरराज्यीय अंमली पदार्थ तस्कर गजाआड

आंतरराज्यीय अंमली पदार्थ तस्कर गजाआड

Published on

आंतरराज्यीय अंमली पदार्थ तस्कर गजाआड
तीन कोटी ३९ लाखांचा मुद्देमाल
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १: आंतरराज्यीय अंमली पदार्थ तस्करी करणाऱ्या उत्तरप्रदेशमधील मोहम्मद मकसूद मोहमद अहमद (४२) याला ठाणे शहर पोलिसांच्या अंमली विरोधी पदार्थ विरोधी पथकाने ताब्यात घेत त्याच्याकडून तीन किलो ३९० ग्रॅम वजनाचा चरस जप्त केला आहे. जप्त केलेल्या चरसची किंमत तीन कोटी ३९ लाख रुपये इतकी आहे. तसेच अटकेतील अहमद हा यापूर्वी खबऱ्या असण्याची शक्यता असून त्याने हा चरस नेपाळ सीमेवरून आणण्याची शक्यता ठाणे गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त अमरसिंह जाधव यांनी ठाण्यात गुरुवारी (ता.३१) वर्तवली आहे.
उथळसर नाका येथे एक जण चरस विक्रीसाठी येत असल्याची माहिती ठाणे अंमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राहुल मस्के यांना मिळाली होती. त्यानुसार गुरुवारी रात्री साडेदहाच्या सुमारास सापळा रचून मोहम्मद अहमद अटक केली. अटकेतील अहमद हा उत्तरप्रदेश येथील प्रयागराज येथील रहिवासी असून तो चरस'' हा अंमली पदार्थ विक्रीसाठी बाळगताना सापडला आहे. याप्रकरणी राबोडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून त्याला ठाणे न्यायालयाने ४ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. तर कारवाईमध्ये जप्त केलेल्या अंमली पदार्थाचे उत्पादन, विक्री, वाहतूक, साठवणूक यामध्ये कोण कोण सहभागी आहे ? याबाबतचा तपास सुरू असल्याची माहिती उपायुक्त जाधव यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com