ठाणे - अलिबाग शिवाईमुळे एसटीला बुस्टर
ठाणे - अलिबाग शिवाईमुळे एसटीला बुस्टर
आठ महिन्यात तीन कोटींची कमाई
ठाणे, ता. २ (बातमीदार) : ठाणे एसटी विभागाकडून सुरू केलेल्या ई-शिवाई इलेक्ट्रिक बससेवा अलिबाग मार्गावर अत्यंत यशस्वी ठरली आहे. पर्यावरणपूरक आणि प्रवाशांसाठी आरामदायी ठरणाऱ्या या बसने अल्पावधीतच लोकांचा विश्वास संपादन केला असून आठ महिन्यांतच या सेवेने तब्बल तीन कोटी १० लाख रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे. ही बस सेवा ८ डिसेंबर २०२४ रोजी सुरू झाली. तेव्हापासून २७ जुलै २०२५ पर्यंत या मार्गावर एकूण ५,६१६ फेऱ्या झाल्या असून, त्यातून दोन लाख३१ हजार ९४९ प्रवाशांची सुरक्षित वाहतूक करण्यात आली. दिवसेंदिवस प्रवाशांची संख्या वाढत असल्यामुळे महामंडळाच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ झाली आहे. एकट्या मे महिन्यात ५१ लाखांहून अधिक उत्पन्न झाले.
ई-शिवाई ही पूर्णपणे इलेक्ट्रिक बस असून ती शून्य प्रदूषण करते. त्यामुळे पर्यावरणावर सकारात्मक परिणाम होत आहे. या बसमध्ये ४४ आरामदायी आसने, प्रशस्त बसके जागा आणि अत्याधुनिक वैशिष्ट्ये असून, साध्या एसटीपेक्षा कमी भाडे आकारले जाते. प्रवाशांना शासनाच्या सवलतींचाही लाभ मिळतो. ठाणे–अलिबाग दरम्यानचे ९७ किमीचे अंतर ई-शिवाई बस अवघ्या दोन तास ४५ मिनिटांत पार करते. यासाठी फक्त २२० रुपये भाडे आकारले जाते. बस ठाणेतील खोपट आगारातून दररोज सकाळी पाच ते सायंकाळी पाच या वेळेत आठ फेऱ्या करत असून, अलिबागहून सायंकाळी ८.४५ पर्यंत परतीच्या फेऱ्या घेतल्या जातात.
अलिबाग हे समुद्रकिनाऱ्यावरील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असून, कुलाबा किल्ला, स्वच्छ किनारे यामुळे पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्र आहे. विशेषतः ठाणेकरांना अलिबागपर्यंत सहज व प्रदूषणमुक्त प्रवास मिळावा, यासाठी ही सेवा सुरू करण्यात आली होती.
प्रवाशांकडून ई-शिवाई बसला उत्तम प्रतिसाद मिळत असून, महामंडळाचा प्रदूषणविरोधी हेतूही या माध्यमातून साध्य होत आहे. भविष्यात अशीच अधिक सेवा उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न असेल.
-सागर पळसुले, विभाग नियंत्रक, ठाणे एसटी विभाग
बस वेळापत्रक (प्रमुख फेऱ्या):
ठाणे सुटण्याची वेळ: सकाळी ५:००, ६:००, ७:००, ८:००, दुपारी २:००, ३:००, ४:००, ५:००
अलिबागहून सुटण्याची वेळ: सकाळी ८:४५, ९:४५, १०:४५, ११:४५, सायंकाळी ५:४५, ६:४५, ७:४५, ८:४५
८ डिसेंबर ते २७ जुलै बसच्या फेऱ्या - ५६१६
महिना प्रवासी संख्या उत्पन्न
डिसेंबर (२०२४) : १८,१९६ २३,०९,१०४
जानेवारी : २४,१३५ ३१,४९,२५१
फेब्रुवारी : २९,२७४ ३९,२४,७४६
मार्च : ३०,४७४ ४१,२४,७३१
एप्रिल : ३८,८७० ४३,९९,१३५
मे : ३५,०३३ ५१,८६,९९०
जून : ३०,५५९ ४३,८२,२६९
जुलै २८ २५,४०८ ३५,२५,९११
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.