असमतोल रस्त्यांमुळे दुचाकीस्वारांचा जीव धोक्यात
असमतोल रस्त्यांमुळे दुचाकीस्वारांचा जीव धोक्यात
आयआयटी जंक्शनजवळील सेवारस्त्यावरील प्रकार
घाटकोपर, ता. २ (बातमीदार) ः अलीकडेच रस्ता आणि रस्त्यातील खड्ड्यांमुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. पूर्व उपनगरांतील पवई आयआयटी जंक्शनजवळील गांधीनगर दिशेने जाणारा सेवामार्ग आता अपघाताचा सापळा बनला आहे.
येथील असमतोल रस्त्यामुळे दिवसागणिक दुचाकी अपघातांचे प्रमाण वाढले आहे. दरदिवशी घडलेल्या अपघातांमुळे दुचाकीस्वार जखमी होत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. याबाबत वारंवार ऑनलाइन आणि लेखी तक्रारी करूनही प्रशासनाकडून दखल घेतली जात नसल्याबाबत नागरिकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. पूर्व उपनगरांतील जेव्हीएलआरवरून गांधीनगर एलबीएस मार्ग जोडणारा हा प्रमुख रस्ता आहे. हा रस्ता अर्धा सिमेंट काँक्रीट आणि अर्धा डांबरी रस्ता आहे. या रस्त्यावरून चाकरमान्यांची रहदारी मोठ्या प्रमाणावर असते. बेस्ट बसचा थांबा रस्त्यालगत आहे. दरम्यान, दुचाकी चालवणारे या रस्त्याने सुसाट जात असल्याने असमतोल रस्त्याचा अंदाज येत नाही. त्यामुळे येथे अपघात घडतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.