राज्यस्तरीय ज्युनिअर लगोरी स्पर्धेत रायगडचा डंका;

राज्यस्तरीय ज्युनिअर लगोरी स्पर्धेत रायगडचा डंका;

Published on

राज्यस्तरीय ज्युनियर लगोरी स्पर्धेत रायगडचा डंका;
दोन्ही गटांत अजिंक्यपदाची कमान
नवी मुंबई, ता. ३ (वार्ताहर) : प्राचीन आणि पारंपरिक असलेल्या लगोरी या स्वदेशी खेळाला नवसंजीवनी देणाऱ्या महा लगोरी असोसिएशनच्या वतीने आणि भारतीय लगोरी फेडरेशनच्या मान्यतेने आयोजित राज्यस्तरीय ज्युनियर अजिंक्यपद स्पर्धेत रायगड जिल्ह्याने ठसा उमटवत मुलांच्या आणि मुलींच्या गटातही अजिंक्यपद पटकावले. ही स्पर्धा नवी मुंबईतील कोपरखैरणे येथील क्राईस्ट अकॅडमी स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये पार पडली.
स्पर्धेचे उद्घाटन नवी मुंबई शिवसेना महिला जिल्हाप्रमुख शीतल कचरे व माजी नगरसेविका दमयंती आचरे यांच्या हस्ते पारंपरिक पद्धतीने लगोरी फोडून करण्यात आले. या वेळी महा लगोरी असोसिएशनचे डायरेक्टर भरत गुरव, सचिव वैभव शिंदे, मुंबई संघटनेचे राकेश शेठ यांच्यासह विविध जिल्ह्यांतील खेळाडू व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या स्पर्धेत महाराष्ट्रातील १२ जिल्ह्यांमधून २१० खेळाडूंनी सहभाग नोंदवला. शीतल कचरे यांनी आपल्या भाषणात पारंपरिक खेळांचे महत्त्व अधोरेखित करताना, आजच्या यांत्रिक युगात मुलांनी खेळांकडे पाठ फिरवली आहे. अशा परिस्थितीत लगोरीसारख्या खेळाला प्रोत्साहन देणारे उपक्रम अत्यंत स्वागतार्ह आहेत, असे सांगितले. स्व. संतोष गुरव यांनी संपूर्ण आयुष्य या खेळाच्या प्रसारासाठी वाहून घेतले आणि त्यांच्या प्रयत्नांमुळे आज जगातील ३० देशांमध्ये हा खेळ खेळला जातो, हे विशेष उल्लेखनीय आहे.
...............
स्पर्धेच्या निकालात, मुलांच्या गटात रायगड प्रथम, नांदेड दुसरा, तर ठाणे आणि कोल्हापूर तृतीय क्रमांकाचे सहविजेते ठरले. मुलींच्या गटातही रायगडने प्रथम क्रमांक पटकावला, तर ठाणे दुसऱ्या स्थानावर राहिला. पुणे आणि मुंबईने तृतीय क्रमांक मिळवला. बक्षीस वितरण समारंभात शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त संदीप गुरव, विजय लोणारी, वैभव शिंदे आदी उपस्थित होते. स्पर्धेचे पंच म्हणून किरण सावंत, विजय लोणारी, प्रणव डोके, सिद्धी गुरव यांच्यासह इतरांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com