स्वच्छ परिसर अभियान’चा तिसरा व चौथा टप्पा यशस्वी;

स्वच्छ परिसर अभियान’चा तिसरा व चौथा टप्पा यशस्वी;
Published on

जुहू आणि शिरवणे गावात पालिकेचे स्वच्छता अभियान
तुर्भे, ता. २ (बातमीदार) : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या डीप क्लीन ड्राइव्ह क्लीअर अंतर्गत युवासेनेच्या वतीने जुहू गाव (वाशी) आणि शिरवणे गाव येथे स्वच्छ परिसर अभियानचा तिसरा व चौथा टप्पा यशस्वीपणे राबवण्यात आला.
स्वच्छतेकडे दुर्लक्षित असलेल्या या दोन्ही गावांमध्ये स्थानिक नागरिक, युवा सैनिक व नवी मुंबई पालिका स्वच्छता विभागाच्या सहकार्याने १५० हून अधिक स्वयंसेवकांनी एकत्र येत जवळपास पाच टन कचरा उचलला. ही केवळ एक दिवसाची मोहीम नव्हे, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनातून उभी राहिलेली एक स्वच्छतेची जनचळवळ आहे. यामध्ये लोकसहभाग वाढवत प्रत्येक गावठाणाचा चेहरामोहरा बदलण्याचा संकल्प आपण केला आहे. पुढील टप्प्यात बेलापूर मतदारसंघातील इतर गावांमध्ये ही मोहीम अधिक जोमाने राबवली जाणार असल्याचे युवासेना समन्वय भावेश गुरुनाथ पाटील यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com