मुरबाड-चिखले कायमस्वरूपी खड्डेमुक्त करा
मुरबाड, ता. २ (वार्ताहर) : मुरबाड-शिरगाव-चिखले आणि मुरबाड-पवाळे-बोरगाव रस्त्यावरील खड्डे, रस्त्यांची दयनीय अवस्था आणि महावितरणच्या भोंगळ कारभाराविरोधात काँग्रेस तालुकाध्यक्ष चेतनसिंह पवार यांच्या नेतृत्वाखाली शिरगाव ते मुरबाड (७ किमी) पदयात्रा काढण्यात आली. पदयात्रेची सुरुवात शिरगाव येथील हनुमान मूर्तीला हार अर्पण करून करण्यात आली. तर समारोप मुरबाड तहसील कार्यालयात निवासी नायब तहसीदारांना निवेदनाद्वारे करण्यात आला.
मुरबाड-शिरगाव-चिखले आणि मुरबाड-पवाळे-बोरगाव रस्ता तत्काळ दुरुस्त करा, दोन्ही रस्त्याचे रूंदीकरण, शेतकऱ्यांना जमिनी हस्तांतरणाचा मोबदला देऊन करा आणि चिखले पुलाची उंची व रुंदी वाढवा; तसेच वीजपुरवठा दिवसातून अनेक वेळा खंडित होण्यास तत्काळ आळा घालणे, अशा मागण्यांचे निवेदन निवासी व महसूल नायब तहसीलदारांकडे सुपूर्द केले. या वेळी शिरगाव, चिखले, मोहरई , कुडवली, पवाळे, पिंपळगाव, वेलद्याची वाडी, वज्रेची वाडी, नानकसवाडी, भालुक ठाकरेनगर, मानिवली (गो) बोरगाव-शिंदीपाडा व तालुक्यातील शेकडो नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
या वेळी किसानचे प्रदेश सचिव तुकाराम ठाकरे, युवक तालुकाध्यक्ष धनाजी बांगर, ओबीसी तालुकाध्यक्ष अनिल चिराटे, सिटुचे अध्यक्ष दिलीप कराळे, भरत विशे, चोरघे, आर. के. शेख, नेताजी लाटे, जयवंत हरड, गुरुनाथ देशमुख, सरपंच दीपक हरड, अमोल चोरघे, मुस्ताक शेख, वसंत कराळे, अमोल चौधरी, नितीन चोरघे, काळुराम गोंधळी, अरुण डोहळे, माजी सरपंच गणपत विशे, विकास चौधरी, दशरथ चौधरी, नियाज शेख, उपसरपंच सुधीर पवार, हरेश पवार, सुनील बाबरे, विश्वास रसाळ, सचिन धुमाळ, निवृत्ती हरणे आदी मान्यवर उपस्थित होते.
नागरिकांची कैफियत
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल चिराटे व आभार चोरघे यांनी मानले. तर नंदू शिंदे यांनी मुरबाडी भाषेमध्ये खड्डेग्रस्तांची व्यथा समुदायासमोर मांडली. खराब रस्त्यांमुळे कोळठण परिसरातील जखमी महिलेची कैफियत तुकाराम ठाकरे यांनी मांडली. मुरबाड-शिरगाव व मुरबाड-बोरगाव रस्त्यावरील खड्ड्यांची तात्पुरती दुरुस्त नागरिकांना मंजूर नसून, पुढील दहा दिवसांत कायमस्वरूपी दुरुस्ती करावी; अन्यथा उग्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा तालुकाध्यक्ष चेतनसिंह पवार यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.