
उल्हासनगर, ता. २ (वार्ताहर) : उल्हासनगरातील संतोषनगर, ओटी सेक्शन परिसरात काही वर्षांपासून नागरिकांमध्ये भीती निर्माण करणारा सराईत गुन्हेगार गणेश सुरेश राणे (वय ३१) याच्यावर अखेर एमपीडीए कायद्यानुसार कडक कारवाई करण्यात आली आहे. त्याला थेट नाशिक रोड येथील मध्यवर्ती कारागृहात एका वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात आले आहे. ठाणे पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या आदेशानुसार उपायुक्त सचिन गोरे यांनी ही कारवाई केली.
गणेश राणे हा शिवसेना शाखेजवळ, संतोषनगर येथे राहतो आणि विठ्ठलवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत त्याच्याविरुद्ध जबरी चोरी, धमकी, मारहाण यांसारख्या सहा गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. परिसरात दहशत निर्माण करून नागरिकांना धमक्या देणे, दमदाटी करणे आणि गुंडगिरी करणे, ही त्याची सवयच झाली होती. विशेष म्हणजे त्याच्याविरुद्ध सामान्य नागरिक तक्रार द्यायलाही घाबरत होते. तो प्रत्येक वेळी जामीनावर सुटून पुन्हा पुन्हा गंभीर गुन्ह्यांमध्ये अडकत होता.
या गुन्हेगारी प्रवृत्तीला आवर घालण्यासाठी गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली विठ्ठलवाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अशोक कोळी यांनी एमपीडीएअंतर्गत प्रस्ताव सादर केला होता. यावर आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी ३० जुलैला मंजुरी दिली. त्यानुसार १ ऑगस्टला पहाटे ३.५० वाजता राणेला नाशिक मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध केल्याची माहिती गोरे यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.