टाकाऊ कपडयांतून सजावट साहित्य निर्मिती

टाकाऊ कपडयांतून सजावट साहित्य निर्मिती

Published on

टाकाऊ कपड्यांतून सजावट साहित्यनिर्मिती
गणेशोत्सवात शोभिवंत साहित्य वापरण्याचे पालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांचे आवाहन
वाशी, ता. २ (बातमीदार) ः गणेशोत्सवाच्या सजावटीसाठी नागरिकांनी वस्त्र पुनर्प्रक्रिया सुविधा प्रकल्प केंद्रामध्ये बनविलेल्या शोभिवंत वस्तूंचा वापर करून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन पालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी केले आहे, तर शोभिवंत वस्त्र साहित्य नागरिकांना सहजपणे उपलब्ध होईल अशाप्रकारे मॉल्स, मार्केट्सच्या ठिकाणी प्रदर्शने मांडावीत, असे निर्देश प्रशासनाला दिले आहेत.
केंद्र सरकारच्या वस्त्र मंत्रालयांतर्गत वस्त्र समितीच्या वतीने नवी मुंबई महानगरपालिके समवेत वस्त्र पुनर्प्रक्रिया सुविधा प्रकल्प देशात पहिल्यांदाच नवी मुंबई येथील बेलापूरमध्ये राबवण्यात येत आहे. या प्रकल्पांची कैलास शिंदे यांनी शुक्रवारी (ता. १) पाहणी केली. या वेळी या प्रकल्पाची व्याप्ती वाढविण्याच्या दृष्टीने शिंदे यांनी महत्त्वाच्या सूचना केल्या. याप्रसंगी त्यांच्यासमवेत वस्त्र मंत्रालयाचे संचालक तपनकुमार राऊत, पालिकेचे शहर अभियंता शिरीष आरदवाड, घनकचरा व्यवस्थापन विभाग उपायुक्त डॉ. अजय गडदे व स्मिता काळे, बेलापूर विभाग सहाय्यक आयुक्त डॉ. अमोल पालवे, कार्यकारी अभियंता मदन वाघचौडे, प्रकल्प संचालक प्रकाश सैनी व इतर अधिकारी उपस्थित होते.

महिलांना रोजगार
या प्रकल्पाच वापरलेले कपडे सोसायट्यांमधून संकलित केलेले कपडे या केंद्रात आणत त्याचे आठ प्रकारे वर्गीकरण केले जाते व त्यापासून पुनर्निमिती केली जाते. विशेष म्हणजे याव्दारे महिला बचत गटातील सदस्यांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळालेला आहे.

आयुक्तांचे निर्देश
कपडे संकलनासाठी पेट्यांची संख्या वाढवून जास्तीत जास्त सोसायट्या व वसाहतींमधील नागरिकांना या प्रक्रियेत सहभागी करून घेण्याचे निर्देश शिंदे यांनी दिले. तसेच त्यादृष्टीने या प्रकल्पाचे महत्त्व नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्याच्या सूचना केल्या.

Marathi News Esakal
www.esakal.com