पुणे पोर्श अपघात प्रकरण:

पुणे पोर्श अपघात प्रकरण:

Published on

आरोपीला तीन दिवसांचा
तात्पुरता जामीन मंजूर

पुणे पोर्शे अपघात प्रकरण

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २ : पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणातील आरोपीला त्याच्या वडिलांचा मृत्यू झाल्यामुळे उच्च न्यायालयाने तीन दिवसांचा तात्पुरता जामीन मंजूर केला. न्या. अश्विन भोबे यांच्या एकलपीठाने नुकताच आदित्य सूदला २ ते ५ ऑगस्टपर्यंत तात्पुरता जामीन मंजूर केला.
१९ मे २०२४ रोजी पुण्यातील कल्याणीनगर परिसरात मद्यधुंद अवस्थेत १७ वर्षीय वेदान्त अग्रवालने पोर्शे गाडीने दोघांना उडवले होते. याप्रकणी आरोपी वेदान्तचे रक्ताचे नमुने बदलण्याचा आरोप अर्जदार आदित्य सूदवर आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, आदित्य सूदने वेन्दातचे रक्ताचे नमुने त्याच्या वडिलांच्या रक्ताने बदलण्यात आले. या प्रकरणात आदित्यसह ससून रुग्णालयाचे कर्मचारी अतुल घाटकांबळे, आशीष मित्तल आणि अरुण कुमार सिंग आणि दोन डॉक्टर अजय तावरे आणि श्रीहरी हालनोर यांनीही महत्त्वाची भूमिका बजावल्याचा आरोप आहे.
आदित्यच्या वडिलांना २७ जुलैला हृदयविकाराचा झटका आला आणि १ ऑगस्टला रुग्णालयात त्यांचे निधन झाले आहे. त्यामुळे वडिलांच्या अंत्यसंस्कारात सहभागी होण्यासाठी तीन दिवसांचा अंतरिम जामीन मिळावा, अशी मागणी आदित्यच्या वतीने वकील आबिद मुलाणी यांनी न्यायालयाकडे केली. त्यावर सरकारी वकिलांनी कोणताही आक्षेप नोंदवला नाही. त्याची दखल घेऊन यालयाने सूदला २५ हजार रुपयांच्या मुचलक्यावर जामीन मंजूर केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com