देशाच्या अर्थव्यवस्थेत कामगार वर्ग महत्वाचा
देशाच्या अर्थव्यवस्थेत कामगार वर्ग महत्वाचा
प्रा. डॉ. प्रमोद हेरोडे यांचे प्रतिपादन; मागासवर्गीय कर्मचारी संघटनेचा संभाजीनगरमध्ये प्रशिक्षण दौरा
कल्याण, ता. ३ (वार्ताहर) : देशाच्या अर्थव्यवस्थेत भांडवलदारवर्ग महत्त्वाचा आहे, तितकाच कामगारवर्गदेखील महत्त्वाचा आहे, परंतु वस्तुस्थिती अशी आहे की, या कामगारवर्गाला पाहिजे तितकं महत्त्व दिले जात नाही. त्यामुळेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा राजकीय पक्ष स्थापन करण्याआधी स्वतंत्र मजूर युनियनची स्थापना केली होती, असे मत प्रा. डॉ. प्रमोद हेरोडे यांनी व्यक्त केले. कल्याण-डोंबिवली महापालिका मागासवर्गीय कर्मचारी संघटनेच्या वतीने संभाजीनगर येथे रायबहादूर नारायण मेघाजी लोखंडे कामगार प्रशिक्षण केंद्रात दोनदिवसीय प्रशिक्षण आणि अभ्यास दौरा आयोजित केला होता. या वेळी ते बोलत होते.
प्रशिक्षण आणि अभ्यास दौऱ्याचे आयोजन जयंती समितीचे अध्यक्ष संतोष हेरोडे यांनी केले होते. या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा. डॉ. प्रमोद हेरोडे यांनी मार्गदर्शन केले. कल्याण-डोंबिवली महापालिका बहुजन कर्मचारी परिवर्तन संस्था आणि संघटनेच्या वतीने अभ्यास दौरा आणि प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केल्याबद्दल संघटनेचे कौतुक केले. कल्याण-डोंबिवली महानगरपालिका बहुजन कर्मचारी परिवर्तन संस्थेचे पदाधिकारी बाबासाहेब काकडे, नितीन रामराजे, राजू काऊतकर, संजीवनी पाटकर, पोर्णिमा कांबळे, गायकवाड, भाऊराव पंडित, हरिश्चंद्र जाधव, समाधान मोरे, बाळू शिंदे, अरुण भालेराव, श्रीकांत वाघमारे, नवनीत गायकवाड, नागेश ठोळ, दामोधर साळवे, सुनील अंबाडे, डॉ. प्रदीप जगताप उपस्थित होते. या वेळी कार्याध्यक्ष, माजी महापौर डॉ. रमेश जाधव, संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत पोळ, मिलिंद महाविद्यालयाचे प्रा.डॉ. प्रमोद हेरोडे, जयंती समिती अध्यक्ष संतोष हेरोडे, रवींद्र धन्वे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता, महावितरण ओव्हळ, उपकार्यकारी महावितरण डॉ. प्रदीप जगताप इत्यादी सह मान्यवर उपस्थित होते. या वेळी सूत्रसंचालन समाधान मोरे यांनी केले, तर आभार प्रदर्शन सुनील अंबाडे यांनी केले.
विधायक कामाची माहिती
बाबासाहेब ज्या पद्धतीने कामगारांच्या प्रश्नांना महत्त्व देत होते, अगदी तसेच महत्त्व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतंत्र मजदूर युनियनला महत्त्व दिले. निवडणुका लढले आणि जिंकलेदेखील, अशा विविध पैलूंवरती त्यांनी भाष्य केले. या वेळी माजी महापौर रमेश जाधव यांनीदेखील आपल्या अध्यक्षीय भाषणात कल्याण-डोंबिवली महापालिकेत केलेल्या विधायक कामाची माहिती दिली, तसेच दैनंदिन जीवनातील प्रवास सुरू करताना रिक्षावाला ते थेट महापौरपदापर्यंत कसे पोहोचलो याची संघर्ष गाथा या वेळी व्यक्त केली. त्याचबरोबर उपस्थित मान्यवरांनी याप्रसंगी मनोगत व्यक्त केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.