मुंबई
विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा
लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त
विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा
मालाड, ता. ३ (बातमीदार) ः लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त उत्कर्ष मंदिर प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांसाठी मनाचे श्लोक पठण, वक्तृत्व, हस्ताक्षर, गीतगायन स्पर्धा घेण्यात आल्या. या कार्यक्रमास सुप्रसिद्ध साहित्यिक, दिग्दर्शक अभय पैर यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका कविता खरात यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षिका सानिका पेवेकर, तन्वी हंजनकर, सेजल पावसकर यांनी कार्यक्रमाचे उत्तम नियोजन केले. वैदेही शितूत यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केले. सुरेंद्र मुधोळकर, घाणेकर या शिक्षकांनी विद्यार्थ्यांकडून स्वागतगीत सादरीकरण करून घेतले.