
छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या
नवी मुंबई (वार्ताहर): खारघरमध्ये राहणाऱ्या २५ वर्षीय विवाहितेने सासरच्या जाचाला कंटाळून राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली होती. या प्रकरणात खारघर पोलिस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल आहे.
खारघर सेक्टर-१३ मधील नीरज जैस्वाल (३०) याच्यासोबत २६ जुलै २०२४ रोजी करिश्माचे (२५) लग्न झाले. करिष्माच्या आई-वडिलांनी लग्नात सात तोळे सोने आणि एक लाख रुपये रोख स्वरूपात दिले होते, मात्र लग्नानंतर तिच्या सासरकडील मंडळींकडून वारंवार हुंडा, सोने आणि भांड्यांच्या मागणीसाठी तिला त्रास देण्यात येत होता. करिश्माची सासू तिला सतत टोमणे मारत होती. तसेच आई-वडिलांनी कबूल केलेले दिले नसल्याचे बोलून मानसिक त्रास देत असल्याचे तक्रारीत नमूद आहे.