ग्रामीण भागाचे आरोग्य वाऱ्यावर
अलिबाग, ता. ३ (वार्ताहर)ः रायगड जिल्ह्यातील ग्रामीण भागात ५३ प्राथमिक आरोग्य केंद्र व २८८ उपकेंद्रांच्या माध्यमातून आरोग्य सेवा देण्यात येते; मात्र या केंद्रांतील एक हजार ३३३ मंजूर पदांपैकी ५११ पदे रिक्त असल्याने कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे.
जिल्ह्यातील ग्रामीण भागातील, वाडी-वस्तींवरील रुग्णांना आरोग्य सेवा मिळावी, यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ग्रामीण भागात ५३ प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करण्यात आली. त्याचबरोबर संबंधित गावच्या जवळपासच्या गावातील रुग्णांच्या लसीकरणासारख्या तसेच इतर काही आरोग्याच्या सोयींसाठी आरोग्य २८८ उपकेंद्रेही सुरू आहेत. ग्रामीण भागातील जनतेला आरोग्य सेवा पुरविण्यात येत आहे; पण प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रांमध्ये वैद्यकीय अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांची अनेक पदे रिक्त आहेत. या रिक्त पदांमध्ये आठ वैद्यकीय अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
---------------------------------
सध्याची परिस्थिती ः
प्राथमिक आरोग्य केंद्र - ५३, उपकेंद्र - २८८
मंजूर पदे - एक हजार ३३३
पदे रिक्त - ५११
वर्ग एक व वर्ग दोन वैद्यकीय अधिकारी आठ पदे
आरोग्य पर्यवेक्षक - ४
औषध निर्माण अधिकारी - ६
आरोग्य सहाय्यक पुरुष - १
आरोग्य सहाय्यक महिला - ३०
आरोग्य सेवक पुरुष - ६८
आरोग्य सेवक महिला - ३२१
प्रशिक्षित ताई - २
सफाई कामगार - ५०
स्त्री परिचर - २१
---------------------------------------
‘या’ सेवांवर परिणामाची शक्यता
- स्त्रिया आणि मुलांच्या आरोग्याकरिता आखलेले राष्ट्रीय कार्यक्रम राबवणे, हिवताप, हत्तीरोग, टीबी, कुष्ठरोग, अंधत्व, लैंगिक रोग आणि एड्स वगैरे आजारांचे नियंत्रण, सहा रोगांवर लसीकरण करणे, गरोदरपण, बाळंतपण आणि बाळंतपणानंतर लागणारी आरोग्य सेवा पुरवणे अशा सेवा पुरविल्या जातात.
- शाळेतल्या मुलांची वैद्यकीय तपासणी आणि उपचार करणे, संतती नियमनाच्या सेवा, शस्त्रक्रिया तसेच सुरक्षित गर्भपात करणे, आजार रोखण्यासाठी आणि चांगल्या आरोग्यासाठी आरोग्य प्रशिक्षण देणे, रोगांचे निदान, उपचार आणि रोगांच्या प्रतिबंधासाठी मोहीम राबवणे, जत्रांमध्ये आणि आठवडे बाजारांच्या ठिकाणी आरोग्य सेवा पुरवणे.
---------------------------------
परीक्षेतील अपयशामुळे रिक्त पदे
आरोग्य सेविकांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. आरोग्यसेविका महिला पदासाठी भरती प्रक्रिया घेण्यात आली होती; मात्र लेखी परीक्षेत पात्र न झाल्यामुळे काही पदे रिक्त आहेत. त्यामुळे अतिरिक्त ताण हा थोडा पडतो; पण त्याचा नागरिकांच्या सेवांवर परिणाम होणार नाही, याची काळजी घेतल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दयानंद सूर्यवंशी यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.