महापालिकेसाठी भाजपची मोर्चेबांधणी

महापालिकेसाठी भाजपची मोर्चेबांधणी

Published on

महापालिकेसाठी भाजपची मोर्चेबांधणी
कल्याण डोंबिवलीत भाजप स्वबळावर लढणार
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ३ : कल्याण-डोंबिवली महापालिकेला लागलेले विकासाचे ग्रहण दूर करण्यासाठी इकडे भाजपचा महापौर असणे आवश्यक आहे, असे मत भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी कल्याणमध्ये व्यक्त केले. येत्या पालिका निवडणुकीत भाजप स्वाबळावर लढणार, असे संकेत देखील त्यांनी यावेळी दिले. कल्याणमधील सामाजिक कार्यकर्ते जतीन प्रजापती यांच्यासह अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी रविवारी (ता. ३) भाजपमध्ये प्रवेश केला. यामुळे कल्याणमध्ये भाजपची ताकद वाढल्याचे म्हटले जात आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रात विकासाचा झंजावात सुरू आहे. अनेक पक्षांतील पदाधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करत आहेत, तर कल्याणचा हा संपूर्ण परिसर आपल्याला भाजपमय करायचा असून, त्यासाठी आपण सर्वांनी संघटनात्मकदृष्ट्या एकत्रित काम करण्याचे आवाहनही प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी या वेळी केले. दरम्यान, सामाजिक कार्यकर्ते जतीन प्रजापती यांनी त्यांच्या शेकडो समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केला. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील, जिल्हाध्यक्ष नंदू परब आदी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत कल्याण पश्चिमेतील महाजनवाडी सभागृहात हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.

कार्यक्रमाला भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, ज्येष्ठ नेते जगन्नाथ पाटील, माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील, आमदार सुलभा गायकवाड, प्रदेश महिला आघाडी सचिव प्रिया शर्मा, जिल्हाध्यक्ष नंदू परब, माजी शहराध्यक्ष वरुण पाटील, प्रेमनाथ म्हात्रे, मंडल अध्यक्ष रितेश फडके, स्वप्नील काठे, अमित धाक्रस यांच्यासह अनेक मान्यवर व्यक्ती, व्यापारी संघटना, गुजराथी, मारवाडी, मराठा समाजाचे नेते, महिलावर्ग उपस्थित होते.

तरुणांची मोठी फौज
कल्याणच्या सामाजिक आणि राजकीय वर्तुळात जतीन प्रजापती हे एक मोठे नाव आहे. प्रजापती यांनी २०१० आणि २०१५ मध्ये स्वबळावर अपक्ष म्हणून कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेची निवडणूक लढवली होती; मात्र अवघ्या काही मतांच्या फरकाने त्यांचा विजय निसटत्या पराभवाला सामोरे जावे लागले होते, परंतु त्यानंतरही खचून न जाता त्यांनी अस्तित्व प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपले सामाजिक कार्य सुरूच ठेवले. परिणामी त्यांचे हे सामाजिक काम, पाठीशी असलेली तरुणांची मोठी फौज आणि शहरात असलेला प्रचंड जनसंपर्क पाहता भाजपकडून त्यांना पक्षात घेण्यासाठी हालचाली सुरू होत्या. त्यात भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण यांची नियुक्ती झाल्यानंतर या प्रक्रियेला वेग आला आणि अखेर जतीन प्रजापती यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com