मुंबई
धसई परिसरात गुरे चोरणारी टोळी सक्रिय
धसई परिसरात गुरे चोरणारी टोळी सक्रिय
मुरबाड, ता. ३ (बातमीदार) : तालुक्यातील धसई परिसरात गुरे चोरांची टोळी सक्रिय झाली आहे. शनिवारी (ता. २) रात्री गुरे चोरांनी दोन बैलांना बेशुद्ध करून एका चारचाकीतून नेण्याचा प्रयत्न केला; परंतु काही तरुणांच्या निदर्शनास ही घटना आली असता त्यांनी आरडाओरड केला, त्यामुळे या टोळीतील लोकांनी एक बैल कारमध्ये घालून पळ काढला. यात दुसऱ्या बैलाला लोकांनी जीवदान दिले. धसई परिसर सह्याद्री पर्वताच्या पायथ्याशेजारी येत आहे, त्यामुळे जंगल भागात मोठ्या प्रमाणावर भटकी गुरे मोकाट फिरत असतात. याचा फायदा जनावरे चोर उचलत आहेत. टोकावडे पोलिसांनी या चोरांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिक करीत आहेत.