मुरुड आगारात सीएनजी गॅस पंप नसल्याने प्रवाशांची गैरसोय
मुरूड आगारात सीएनजी गॅसपंप नसल्याने प्रवाशांची गैरसोय
मुरूड, ता. ३ (बातमीदार) ः मुरूड हे पर्यटकांचे आवडते ठिकाण आहे. ऐतिहासिक किल्ले आणि विस्तीर्ण समुद्रकिनारा, ताजी मासळी आणि माडीची चव चाखण्यासाठी पर्यटक पर्यटनासाठी येत असतात. सर्वसामान्य व मध्यमवर्ग आजही लालपरीला पसंती देतो, परंतु मुरूड आगाराला परिवहन महामंडळाने सीएनजी गॅसपंप उपलब्ध न केल्याने मोठी गैरसोय होत असल्याची तक्रार प्रवासी करत आहेत.
मुंबईसह बोरिवली, भांडुप, ठाणे, कल्याण या उपनगरांतून तसेच धुळे, नाशिक, शिर्डी, पुणे आदी ठिकाणी लालपरी धावत असल्याने पर्यटक मोठ्या संख्येने मुरूड या पर्यटन नगरीत वर्षभर येत असतात. मुरूड आगारात ४० बसेस असून, अलीकडे पाच नवीन लालपरीचे लोकार्पण झाले होते. काही अपवाद वगळता उर्वरित सर्व गाड्यांना अलिबाग येथे सीएनजी भरावा लागतो. गॅस भरताना प्रवाशांना एसटीची किमान अर्धा तास बाहेर प्रतीक्षा करावी लागते. त्यामुळे इच्छितस्थळी बसेस वेळेवर पोहोचू शकत नाहीत. परिणामी प्रवाशांची चिडचिड होते.
पाच नवीन बसेसचा लोकार्पण सोहळ्यात आमदार महेंद्र दळवी यांनी पावसाळी अधिवेशनात मुरूड आगारासाठी अर्थसंकल्पात काही रक्कम मिळवून देईल आणि लवकरच मुरूड आगाराला सीएनजी गॅस युनिट मिळवून देऊ, असे आश्वासन दिले होते. दरम्यान, राष्ट्रवादी पक्षाचे माजी नगराध्यक्ष मंगेश दांडेकर यांनीदेखील शिष्टमंडळासह खासदार सुनील तरकरे यांच्याकडे सीएनजीची आग्रही मागणी केली होती.
सीएनजी गॅस केंद्र मुरूड आगाराला लवकरात लवकर मिळावे, अशी स्थानिकांसह पर्यटकांची मागणी आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय तर दूर होईलच, शिवाय एसटीच्या फेऱ्या नियमित होण्यास मदत होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.