सातवाहन साम्राज्याचा कुडालेणीत ठेवा

सातवाहन साम्राज्याचा कुडालेणीत ठेवा

Published on

कृष्णा भोसले ः सकाळ वृत्तसेवा
तळा, ता. ४ ः मुंबई-गोवा महामार्गावरील इंदापूरपासून अवघ्या १५ किलोमीटरवर असलेल्या तळा तालुक्यात कुडा लेणी आहे. मुरूड जंजिरापासून जवळपास असणारी ही लेणी नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या तसेच सातवाहन साम्राज्याचा स्थापत्य शैलीमुळे प्राचीन इतिहासाच्या अभ्यासकांना आकर्षित करतात. समुद्रकिनाऱ्यालगत असलेल्या टेकडीमध्ये तब्बल २६ कोरीव गुंफा आहेत.
इ. स. तिसऱ्या शतकात निर्माण केलेल्या काही निवडक लेणींमध्ये कुडा लेणीचा समावेश होतो. या लेण्यांची नोंद १८४८ मध्ये सापडते, परंतु त्यानंतर फारशी प्रसिद्धी नव्हती. राजपुरीच्या खाडी ओलांडून जावे लागत होते. आता दळणवळणाची साधने उपलब्ध झाली आहेत. त्यामुळे मांदाडपासुन अगदी जवळ आहे. सातवाहन साम्राज्यातील महाभोजांच्या मांदव घराण्याचे प्रमुख केंद्र असावे, असे मानले जाते. कुडा लेणी ही दोन टप्प्यांत कोरली आहे. १ ते १५ क्रमांक खालच्या स्तरात तर १६ ते २६ ही लेणी वरच्या स्तरावर आहेत. ही सर्व लेणी बौद्धाच्या हिनयान पंतांनी संबंधित आहेत.
----------------------------------------
कोरलेले अंतराळ नवे वैशिष्ट्य
बुद्धप्रतिमा इ. स. सहाव्या शतकात स्थापिल्या गेल्या आहेत. कुड्याच्या २६ गुहापैंकी चार चैत्यगृहे आहेत. येथील भिंती तसेच खांबांवर असणारे शिलालेख दात्यांची माहिती देतात. ज्यामध्ये मंडप, अंतराळ आणि स्तूप असलेले गर्भगृह भागांनी युक्त मंदिर पाहावयास मिळते. कुडा येथे एक मंडप आणि २१ विहार आहेत. मध्यभागी चौरसाकृती सभागृह अथवा मोकळी जागा आणि चारही बाजूंनी खोदल्या अशा प्रकारे प्राचीन विहारांपेक्षा पूर्णपणे भिन्न आहेत. या विहारात कोणतीही सजावट नसते. स्तूपयुक्त गर्भगृहाला लागून कोरलेले अंतराळ स्थापत्य शैलीतील नवे वैशिष्ट्य आहे.
-------------------------------------------
विविध नोंदीचा उल्लेख
अंतराळात भिंतीलगत बसण्याकरिता ओटे येतात. व्हरांड्याच्या आतील बाजूस कोरलेल्या लेखात सुलददत आणि उतरदत यांचा मुलगा शिवमूर्ती यांनी दान दिल्याची नोंद सापडते. लेणीचा दाता शिवभूती आणि त्याची पत्नी नंदा हे दोघेही सदगेरी विजय यांचे पुत्र महाभोज मांदव खंदपालीत लेखक म्हणून कामाला होते. कुडातील शिल्पे सातवाहन काळातील असावी, असा अनुमान आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com