कल्याणचे मुख्य कार्यालय शालेय विद्यार्थींची खाती उघडण्यात राज्यात अग्रेसर

कल्याणचे मुख्य कार्यालय शालेय विद्यार्थींची खाती उघडण्यात राज्यात अग्रेसर

Published on

विद्यार्थ्यांची खाती उघडण्यात कल्याण पोस्ट अग्रेसर
कल्याण, ता. ४ (वार्ताहर) : कल्याण मुख्य पोस्ट कार्यालयाने २०२४-२५ या आर्थिक वर्षात खाते उघडण्यात बाजी मारली आहे. आतापर्यंत कल्याण हेड पोस्ट ऑफिसमध्ये ७४ हजार २६४ सक्रिय ग्राहक खाती आहेत. ९७८ ग्राहकांनी त्यांच्या जुन्या निष्क्रिय झालेले खाते सक्रीयदेखील करून घेतले आहेत. सुमारे ३,५०३ खाते निष्क्रिय झाले असून, सदर खाते पुन्हा सक्रिय करण्यासाठी पोस्ट ऑफिसच्या वतीने सूचित करण्यात येत आहे.
शालेय मुलांसाठी खाती उघडण्यात कल्याण सिटी हेड पोस्ट ऑफिस राज्यात अग्रेसर आहे. आजतागायत १२ हजार ३५३ शालेय मुलांची खाती आहेत. या आर्थिक वर्षात ३५७ विद्यार्थ्यांना दोन लाख ६५ हजार १८० आदिवासी सुवर्णमहोत्सवी शिष्यवृत्ती पोस्ट ऑफिस खात्यात मिळाली आहे. तीन हजार २१५ लाडक्या बहिणींना एक कोटी आठ लाख ४० हजार ८६७ रुपये पोस्ट ऑफिस खात्यात वितरित केले आहेत.
विविध योजनांची १८,२९३ खाती-सुकन्या, पीपीएफ, मुदत ठेव, ज्येष्ठ नागरिक बचत योजना, मासिक उत्पन्न योजना, महिला सन्मान बचत पत्र, शालेय मुलांचे बचत खाते अशा विविध योजनांची १८ हजार २९३ खाती मागील आर्थिक वर्षात काढण्यात आली आहेत. कल्याण सिटी हेड पोस्ट ऑफिसचे पोस्ट मास्टर नागेश खैरनार यांनी म्हटले की, पोस्ट ऑफिस हा केंद्र सरकारचा विभाग असून, पोस्टात पैसे ठेवणे हे भारतात सर्वात सुरक्षित समजले जाते. मार्केटमधील कोणत्याही प्रलोभनांना बळी न पडता नागरिकांनी पोस्ट ऑफिसच्या विविध योजनांची माहिती घेऊन त्यात गुंतवणूक करावी. ज्या ग्राहकांचे खाते असूनही व्यवहार न केल्यामुळे, निष्क्रिय झाले आहे. त्यांनी पोस्ट ऑफिसला संपर्क करून सक्रिय करून घ्यावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com