वक्तृत्वस्पर्धेचे आयोजन
लायन्स क्लबतर्फे तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा
मुरुड, ता. ३ (बातमीदार) ः लायन्स क्लब ऑफ अलिबाग आणि मुरूड जंजिरा यांच्या संयुक्त विद्यमाने व पंचायत समिती शिक्षण विभाग मुरूड यांच्या सहकार्याने लोकमान्य टिळक पुण्यतिथीचे औचित्य साधून जिल्हा गव्हर्नर लायन प्रवीण सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकास्तरीय वक्तृत्त्व स्पर्धा पार पडल्या.
मुरूड तालुक्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळांच्या माध्यमातून १० हजारांहून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते. यामध्ये पहिली ते चौथीच्या पहिल्या गटात प्रथम क्रमांक विदिशा इंगळे ओमकार विद्यामंदिर, संस्कृती बालाजी वडवले नचिकेताज हायस्कूल द्वितीय, तर मृणाली म्हात्रे नगर परिषद हिने तृतीय क्रमांक पटकावला.
पाचवी ते सातवी या दुसऱ्या गटात पार्थ जयवंत पाटील वळके हायस्कूल, सहर्ष हेमंत नांदगावकर नांदगाव हायस्कूल, तर आरोही अशोक पाटील या वळके केंद्रातील चोरढे मराठी यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक पटकावला.
आठवी ते दहावी या गटातून सार्थक कौलकर सर एस ए हायस्कूल प्रथम, देवेश्री गुरव सुविद्या हायस्कूल द्वितीय, तर वळके हायस्कूलच्या आर्या सुधीर विचारे हिने तृतीय क्रमांक मिळवला. त्यातील प्रत्येकी पहिल्या तीन विजेत्यांना अलिबाग लायन्स आणि मुरूड जंजिरा लायन्स क्लबकडून स्मृतिचिन्ह, स्कूलबॅग, जॉमेट्री बॉक्स, पेस्टल कलर्स तसेच उत्तेजनार्थ व इतर सर्व सहभागी स्पर्धकांनाही उत्तम दर्जाचे जॉमेट्री बॉक्स, पेस्टल कलर्स आदी शैक्षणिक साहित्य भेट देण्यात आले.
या वेळी उपस्थितांमध्ये गटशिक्षणाधिकारी सुनील गवळी, अध्यक्ष लायन प्रदीप नाईक, सचिव महेश कवळे तर मुरूड जंजिरा लायन्स क्लबचे अध्यक्ष लायन सनी सोगावकर, खजिनदार मकरंद कर्णिक, विजय वनगे, मनोज भगत, विजय शिंदे, संतोष नागावकर, लायन अविनाश राऊळ, नितीन शेडगे, प्रकाश देशमुख, नितीन पाटील, विनोद कवळे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक किशोर गंभे, दीनेश म्हात्रे, जितेंद्र मकू, राजेंद्र नाईक, प्रवीण भगत, रमाकांत ठाकूर, शरद पाटील, प्रियंका पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.