तिरुपती बालाजी मित्र मंडळाच्या यात्रेला २२ वर्षांची परंपरा

तिरुपती बालाजी मित्र मंडळाच्या यात्रेला २२ वर्षांची परंपरा

Published on

तिरुपती बालाजी मित्र मंडळाच्या यात्रेला २२ वर्षांची परंपरा
कर्जत, ता. ४ (बातमीदार) ः कर्जत शहरातील तिरुपती बालाजी मित्र मंडळ या संस्थेच्या वतीने गेले २२ वर्षे सातत्याने कर्जत (जि. रायगड) ते तिरुपती (जि. चित्तूर, आंध्र प्रदेश) यादरम्यान देवदर्शन सहलीचे आयोजन केले जात आहे. अगदी २० ते २२ जणांनी सुरू केलेली ही सहल आज हजारो भाविकांची भक्तिमय यात्रा ठरत आहे.
तिरुपती बालाजी मंदिर हे आंध्र प्रदेश राज्यातील चित्तूर जिल्ह्यातील तिरुमला पर्वतरांगांमध्ये वसलेले असून, श्री वेंकटेश्वर स्वामी (बालाजी) हे येथील मुख्य आराध्य देव आहेत. कर्जत येथून सुमारे १६-१७ तासांचा प्रवास करून भाविक तिरुपती येथे पोहोचतात. भारतातील एक प्रमुख तीर्थक्षेत्र म्हणून या मंदिराची कीर्ती असून, येथे दरवर्षी कोट्यवधी भाविक दर्शनासाठी गर्दी करतात. या यात्रेची संकल्पना आणि आयोजन हे सुधाकर घारे व मधुकर घारे या दोन बंधूंनी एकत्र येऊन सुरू केले. विशेष बाब म्हणजे, ही यात्रा पूर्णपणे निःशुल्क असून, यात्रेतील जेवण, निवास यांचा सर्व खर्च हे दोन्ही बंधू स्वतःच्या खिशातून उचलतात. या उपक्रमामुळे दोघांचीही नावे पंचक्रोशीत आदराने घेतली जात आहेत. २०१७ रोजी सुधाकर घारे यांनी जिल्हा परिषद सदस्य पद आणि उपाध्यक्ष पद भूषवल्यानंतर या यात्रेला अधिक बळ मिळाले. पूर्वी काहीशे भाविकांचा सहभाग असलेल्या यात्रेची संख्या आता एक हजाराच्यावर पोहोचली आहे. यामध्ये तालुक्याच्या विविध गावांतील ग्राममित्र, नातेवाईक, भक्तपरिवार यांचा मोठा सहभाग असतो. ही यात्रा दरवर्षी नियोजितपणे तीन महिने आधी निश्चित केली जाते. यात्रा ठरल्यावर भाविक आपले मित्र, आप्तस्वकीय यांच्यासोबत योजना आखून सहभागी होतात. गेल्या २२ वर्षांत एकही मोठा अडथळा न आल्याने ही यात्रा ‘निर्विघ्न भक्तिपूर्वक’ पार पडत असल्याचा अभिमान सहभागी भाविक व्यक्त करतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com