डोक्यात हेल्मेट मारून केले जखमी
किरकोळ कारणावरुन एकास मारहाण
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता.४ ः दुचाकी काढण्यावरून मुंब्र्यातील सराफदार वसीनअली शेख (वय ४६) यांना आरेझ भुंडा याने मारहाण केली. तर, अरबाज भुंडा याने हातातील हेल्मेट तक्रारदारांच्या डोक्यात मारून जखमी केले. याप्रकरणी त्या दोघांविरोधात गुन्हा दाखल असल्याची माहिती मुंब्रा पोलिसांनी दिली.
राहत्या इमारतीच्या खाली पार्क केलेली दुचाकी काढण्यासाठी वसीनअली यांना अरबाजने फोन केला. यादरम्यान दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर काही वेळाने अरबाज हा तक्रारदारांच्या घरासमोर येऊन शिवीगाळ करू लागला. यावेळी अरबाजने हातातील हेल्मेट तक्रारदारांच्या डोक्यात मारून जखमी केले. याचदरम्यान आरेझ याने वसीनअलीला पकडून मारहाण केली. यावेळी भांडण सोडविण्यासाठी आलेल्या वसीनअली यांच्या पत्नीला
आरेझ याने शिवीगाळ केली. याप्रकरणी मुंब्रा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.