रेल्वे बोर्ड अध्यक्षांचा मुंबई दौरा; १७ स्थानकांच्या पुनर्विकासास गती

रेल्वे बोर्ड अध्यक्षांचा मुंबई दौरा; १७ स्थानकांच्या पुनर्विकासास गती

Published on

१७ स्थानकांच्या पुनर्विकासास गती
रेल्वे बोर्ड अध्यक्षांचा मुंबई दौरा

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ४ : रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष आणि भारत सरकारचे अपर प्रधान सचिव सतीशकुमार यांनी मुंबईतील रेल्वे प्रकल्पांचा तीन दिवसांचा दौरा करीत प्रत्यक्ष पाहणी केली. मुंबईसह नाशिकमधील विविध रेल्वे स्थानकांचा आणि प्रकल्पांचा आढावा घेत त्यांनी अधिकाऱ्यांना कामे दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश दिले.
सतीशकुमार यांनी या दौऱ्यादरम्यान मुंबई रेल्वे विकास महामंडळामार्फत (एमआरव्हीसी) राबविण्यात येणाऱ्या १७ स्थानकांच्या व्हर्टिकल डेव्हलपमेंट प्रकल्पाला गती देण्याचे संकेत दिले. या योजनेतून ६० हजार चौ.मी. स्पेस विकसित केली जाणार असून, ९५० कोटींचा खर्च अपेक्षित आहे. मुंबई उपनगरी रेल्वे नेटवर्कवर प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना, स्थानकांवर भूपृष्ठाला समांतर (हॉरिझॉन्टल) विस्तारासाठी जागाच उपलब्ध नाही. परिणामी एमआरव्हीसीने स्थानकांचा व्हर्टिकल म्हणजेच उभ्या पद्धतीने विकास करण्याचा निर्णय घेतला आहे. याअंतर्गत स्थानकांवर नवीन मजले, वेटिंग एरियाज, लिफ्ट, एस्केलेटर, एफओबी, स्वच्छता व सुरक्षितता सुविधांचा समावेश असणार आहे. सीएसएमटीच्या पुनर्विकास प्रकल्पाचे काम समाधानकारक असून, ते वेगात सुरू आहे, अशी माहितीही त्यांनी या वेळी दिली.
...
या स्थानकांचा समावेश
पश्चिम रेल्वे - खार रोड, सांताक्रूझ, वांद्रे, अंधेरी, भाइंदर, बोरिवली, वलसाड रोड
मध्य रेल्वे - ठाणे, कल्याण, टिटवाळा, अंबरनाथ, बदलापूर, आसनगाव, डोंबिवली, मुंब्रा, ऐरोली, जुईनगर
...
सविस्तर निरीक्षण
रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष सतीशकुमार यांनी शनिवारी खार स्थानक, रविवारी घाटकोपर स्थानक, तर सोमवारी जोगेश्वरी यार्ड येथील नव्या कोचिंग टर्मिनलच्या कामाची पाहणी केली. याशिवाय त्यांनी वंदे भारत एक्स्प्रेसने सीएसएमटी ते नाशिकपर्यंत प्रवास करीत मार्गातील कसबे सुकेणे, खरवंडी, ओढा, देवळाली आणि नाशिक रोड स्थानकांचेही निरीक्षण केले. २०२७मध्ये होणाऱ्या नाशिक कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर हे निरीक्षण महत्त्वाचे मानले जात आहे.
...
‘विकसित भारत २०४७’ चा आराखडा 
सीएसएमटी येथील ‘चिंतन’ कॉन्फरन्स हॉलमध्ये सोमवारी पार पडलेल्या बैठकीला मध्य आणि पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक, एमआरव्हीसीचे अध्यक्ष विलास वाडेकर, आरएलडीएचे उपाध्यक्ष मनोज गर्ग तसेच वरिष्ठ रेल्वे व एमआरव्हीसी अधिकारी उपस्थित होते. बैठकीत ‘विकसित भारत २०४७’ या दिशेने भारतीय रेल्वेचे योगदान, वाढती प्रवासी वाहतूक क्षमता, १५ डब्यांच्या लोकल गाड्यांचे नेटवर्क, नव्या कोचिंग टर्मिनल्स आणि मेगा कोचिंग कॉम्प्लेक्सच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला.
 ...
रेल्वेस्थानकांचा विकास करताना प्रवाशांच्या सुरक्षिततेशी तडजोड होणार नाही. गुणवत्ता, वेग आणि सुविधा यांचा समतोल साधत प्रत्येक प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.
- सतीशकुमार, अध्यक्ष, रेल्वे बोर्ड व अपर प्रधान सचिव, भारत सरकार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com