मुरूड ग्रामीण रुग्णालयाच्या समस्यांकडे लक्ष द्या
मुरूड ग्रामीण रुग्णालयाच्या समस्यांकडे लक्ष द्या
आमदार दळवी यांना पद्मदुर्ग संघटनेचे निवेदन
मुरूड, ता. ५ (बातमीदार) ः मुरूड ग्रामीण रुग्णालयातील मूलभूत अडचणी तत्काळ सोडवाव्यात आणि रुग्णालयासाठी आमदार निधीतून भरघोस अर्थसहाय्य उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी पद्मदुर्ग व्यावसायिक संघटनेचे अध्यक्ष अरविंद गायकर यांनी आमदार महेंद्र दळवी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनात रुग्णालयाच्या विद्यमान स्थितीबाबत गंभीर चिंता व्यक्त करण्यात आली आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण इमारतीत पाणी गळती होत असून, त्याचा थेट परिणाम ऑपरेशन थिएटरसारख्या महत्त्वाच्या विभागांवर होत आहे. अशा अवस्थेमुळे रुग्णांबरोबरच आरोग्य कर्मचाऱ्यांनाही त्रास सहन करावा लागत आहे. विशेषतः ऑपरेशन थिएटरमध्ये गळतीमुळे सर्जन व स्टाफला अडचणींचा सामना करावा लागत असल्याने रुग्णसेवेवरही परिणाम होत आहे. रुग्णवाहिकेसाठी आणि ऑक्सिजन बॉटल्ससाठी स्वतंत्र शेड नसल्याने उपकरणे व गाड्या पावसात भिजत आहेत. यामुळे रुग्णांची आणि यंत्रणेची मोठी गैरसोय होत आहे. याशिवाय आरोग्य कर्मचाऱ्यांची निवासी सुविधा अत्यंत हलाखीची असून, रुग्णालय परिसरात स्वच्छतेचा अभाव आहे. दोन्ही मुख्य प्रवेशद्वारांजवळ पाण्याचा निचरा नीट होत नसल्याने परिसरात चिखलाचे साम्राज्य निर्माण होते.
................
मुरूड ग्रामीण रुग्णालय हे मच्छीमार, आदिवासी, गोरगरीब नागरिकांसाठी एकमेव उपचार केंद्र आहे. त्यामुळे येथे उत्तम सुविधा असणे अत्यावश्यक आहे. या पार्श्वभूमीवर आमदार दळवी यांनी तातडीने रुग्णालयाला भेट देऊन परिस्थितीची पाहणी करावी आणि विकासासाठी निधी मंजूर करावा, अशी मागणी अध्यक्ष अरविंद गायकर यांनी केली आहे. रुग्णसेवेच्या दृष्टीने या मागण्यांकडे तातडीने लक्ष देणे गरजेचे आहे, असे मत स्थानिकांनी व्यक्त केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.