अलिबागमध्ये शिधापत्रिकाधारकांचे हाल

अलिबागमध्ये शिधापत्रिकाधारकांचे हाल

Published on

अलिबागमध्ये शिधापत्रिकाधारकांचे हाल
सर्व्हर डाऊनमुळे शेकडो लाभार्थी ई-केवायसीपासून वंचित
अलिबाग, ता. ५ (वार्ताहर) : सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत लाभ मिळवण्यासाठी शासनाने शिधापत्रिकाधारकांसाठी ई-केवायसी प्रक्रिया अनिवार्य केली आहे; मात्र रायगड जिल्ह्यातील अनेक सेवा केंद्रांमध्ये गेल्या काही दिवसांपासून शासनाचे सर्व्हर सातत्याने डाऊन होत असल्याने ई-केवायसी प्रक्रियेत मोठे अडथळे निर्माण झाले असून, शेकडो लाभार्थ्यांचे काम रखडले आहे.
शासनाच्या सूचनेनुसार, रास्त भाव दुकानांतून धान्याचा लाभ घेणाऱ्या सर्व पात्र शिधापत्रिकाधारकांची १०० टक्के ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक करण्यात आले आहे. यानुसार जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे ७५.७२ टक्के लाभार्थ्यांनी ई-केवायसी पूर्ण केली आहे; मात्र उर्वरित लाभार्थ्यांसाठी ३० जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. ही मुदत संपल्यानंतर शासनाने अजून एक महिना वाढवून दिला असून, नागरिकांची सेवा केंद्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे; परंतु याच काळात सेवा केंद्रांमधील सिस्टिम सतत डाऊन होणे, कनेक्टिव्हिटी नसणे आणि आधार प्रमाणीकरणासाठी आवश्यक असलेले बायोमेट्रिक यंत्रणा अकार्यक्षम होणे, अशा अनेक तांत्रिक अडचणी उद्भवत आहेत. परिणामी, नागरिकांना वारंवार सेवा केंद्रांत जावे लागत असून, त्यांचा वेळ आणि पैसा वाया जात आहे.
...........................
मोबाईल ॲपचा वापर करावा
यासंदर्भात जिल्हा पुरवठा अधिकारी सर्जेराव सोनावणे यांनी सांगितले, की सर्व्हर डाऊन होत असल्याबाबत शासनाच्या संबंधित विभागाकडे तक्रार नोंदवण्यात आली आहे. लवकरच ही समस्या सोडवली जाईल. तसेच ‘Mera eKYC’ हे मोबाईल अ‍ॅप वापरून घरबसल्या ई-केवायसी करता येते, याची माहितीही त्यांनी दिली. सध्याच्या अडचणींचा विचार करता, ई-केवायसीसाठी अधिक सक्षम आणि सातत्यपूर्ण तांत्रिक व्यवस्था उभारणे ही काळाची गरज ठरली आहे; अन्यथा अन्नधान्य लाभापासून नागरिक वंचित राहण्याचा धोका निर्माण होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com