हरिहरेश्वर तीर्थक्षेत्र प्रदक्षिणा मार्गावर

हरिहरेश्वर तीर्थक्षेत्र प्रदक्षिणा मार्गावर

Published on

हुल्लडबाजीने श्रद्धेला गालबोट
हरिहरेश्वरमधील प्रदक्षिणा मार्गावर धोका; सूचना फलकांकडे भाविकांचे दुर्लक्ष
समीर रिसबूड ः सकाळ वृत्तसेवा
श्रीवर्धन, ता. ६ ः तालुक्यातील हरिहरेश्वर दक्षिण काशी म्हणून महाराष्ट्रात ओळखले जाते. समुद्रालगतच्या भगवान शंकराच्या मंदिरासाठी हा परिसर प्रसिद्ध आहे; पण प्रदक्षिणा मार्गावरील सेल्फीच्या नादातील हुल्लडबाजी अनेकांच्या जीवावर बेतली आहे.
राज्यभरातील भाविकांसह पर्यटक सुट्टीच्या दिवसात हरिहरेश्वर येथे हजेरी लावतात. मुख्यत्वे करूम उत्तरक्रिया, पिंडदान विधी हरिहरेश्वर येथे केले जातात. या कारणास्तव येथील समुद्रकिनारा तसेच प्रामुख्याने तीर्थक्षेत्र प्रदक्षिणा मार्गावर भाविक, पर्यटकांची वर्दळ असते; पण हरिहरेश्वर येथील समुद्रात भरती, ओहोटीचा अंदाज येत नसल्याने लाटांच्या तडाख्यात पर्यटक समुद्रात पडल्याच्या घटना घडत आहेत. खडकांवर उसळणाऱ्या लाटांसोबत फोटो, सेल्फी घेण्याच्या मोहात अनेकांनी जीव गमावला आहे. तर काहींचे नशीब बलवत्तर म्हणून थोडक्यात बचावले आहेत.
----------------------------------
अपघातांची कारणे
- हरिहरेश्वर ग्रामपंचायतीच्या वतीने तीर्थक्षेत्र प्रदक्षिणा मार्गावरील धोकादायक ठिकाणे व समुद्रकिनाऱ्यावर पर्यटक, भाविकांसाठी सूचना फलक उभे करीत सावधानता बाळगण्याचे आवाहन केले आहे.
- एखादा प्रसंग उद्भवल्यास आपत्कालीन परिस्थितीत संपर्क साधण्यासाठी हरिहरेश्वर ग्रामपंचायत, श्रीवर्धन पोलिस ठाणे, स्थानिक पोलिस पाटील व रेस्क्यू टीमच्या सभासदांचे भ्रमणध्वनी क्रमांक फलकावर टाकण्यात आले आहेत.
-----------------------
उपाययोजनांची गरज
प्रदक्षिणा मार्ग साधारण अर्धा किलोमीटर लांबीचा आहे. विष्णूपद, चक्रतीर्थ ही दोन धोकादायक ठिकाणे आहेत. पावसाने प्रदक्षिणा मार्गावरील खडक निसरडे झाले आहेत. काही भाविकांच्या मते तीर्थक्षेत्र प्रदक्षिणेच्या धोकादायक ठिकाणांवर स्टीलचे रेलिंग बसवल्यास धोक्याची जागा असल्याचे लक्षात येईल.
़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़-----------------------
ग्रामस्थांचे आवाहन
प्रदक्षिणा मार्गावर जाणाऱ्या भाविकांनी तसेच पर्यटकांनी स्वतःची काळजी घ्यावी. अनेकांना लाटांचा अंदाज येत नाही. लाटांच्या प्रवाहात आतमध्ये खेचले जाण्याचा धोका अधिक असल्याचे हरिहरेश्वर उदय लांगी यांनी सांगितले. तर प्रदक्षिणा मार्गावर एखादी व्यक्ती लाटेच्या प्रवाहाबरोबर वाहून गेल्याचे लक्षात येताच त्यांचा जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करतो; पण नेहमीच अशा प्रकारे मदत करणे अशक्य असल्याने भाविकांनी काळजी घेण्याची गरज रुद्र वॉटर स्पोर्टचे रूपेश मयेकर यांनी व्यक्त केली.
--------------------------------
नोंदवलेल्या अपघातांच्या घटना
पर्यटकांची संख्या ः २५ लाख भाविक (वर्षभरात)
मृत्यू - पाच ते सहा
जखमी - २५ ते ३०
========================================================================
पावसाळ्यात भरती तसेच ओहोटीसंदर्भात मंदिरात सूचना फलक लावण्यात येतो. तसेच ध्वनिक्षेपकावरून सूचना दिल्या जातात; परंतु उत्साही पर्यटक त्याकडे दुर्लक्ष करून अतिरेक करतात. प्रदक्षिणा मार्गासाठी पादचारी पूल मंजूर झाला आहे.
- सिद्धेश पोवार, सचिव/खजिनदार, श्री देव हरिहरेश्वर कालभैरव मंदिर संस्थान

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com