वसई मध्ये निसर्गोत्सव रानभाज्यांचा

वसई मध्ये निसर्गोत्सव रानभाज्यांचा

Published on

वसईमध्ये निसर्गोत्सव रानभाज्यांचा
अनेक मान्यवरांनी घेतला स्वाद
विरार, ता. ६ (बातमीदार) ः आजच्या पिढीला रानभाज्यांची जास्त माहिती नसते. उपक्रमामुळे ही माहिती मिळत असते. या उपक्रमाच्या माध्यमातून परंपरागत अन्न संस्कृती, महिलांचे स्थान आणि पर्यावरणपूरक जीवनशैली यांचा प्रभावी सन्मान होतो, असे प्रतिपादन बिशप थॉमस डिसूझा यांनी मंगळवारी (ता. ६) वसईमध्ये केले. प्रगती महाविद्यालय, लायन्स क्लब वाशी आणि परिवर्तन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने रानभाज्यांचा उत्सव आणि आदिवासी जीवनशैलीचा सन्मान या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या वेळी ते बोलत होते.
या कार्यक्रमाचे उद्‍घाटन बिशप थॉमस डिसूझा यांच्या हस्ते झाले. या उपक्रमाला महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह स्थानिक नागरिक, महिला मंडळे आणि विविध सामाजिक घटकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या उपक्रमातून पारंपरिक आदिवासी अन्न संस्कृतीचे संवर्धन, महिलांचे सशक्तीकरण आणि पर्यावरणपूरक जीवनशैलीचा जागर करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी एनएसएस स्वयंसेवक, विद्यार्थ्यांचे सक्रिय योगदान, प्राध्यापकवर्ग आणि सर्व संबंधित समित्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. मुंबई विद्यापीठाचे आणि लायन्स क्लब आणि परिवर्तन संस्थेचे आभार मानण्यात आले.

ग्रामीण महिलांकडून पाककृतींचे थेट प्रात्यक्षिक
उत्सवाचे प्रमुख आकर्षण ठरले ते म्हणजे विविध प्रकारच्या रानभाज्यांचे माहितीपूर्ण प्रदर्शन, पोषणमूल्ये व पारंपरिक उपयोग याची सविस्तर माहिती, आदिवासी व ग्रामीण भागातील महिलांकडून पारंपरिक पाककृतींचे थेट प्रात्यक्षिक, रानभाज्यांच्या चविष्ट पदार्थांचे चव परीक्षण, विद्यार्थ्यांसाठी स्पॉट गेम्स आणि माहितीपूर्ण प्रश्नमंजुषा, रानभाज्यांचे औषधी उपयोग व आरोग्यदायी महत्त्वावर विशेष सादरीकरण, महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com